उस्मानाबाद प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी चंद्रसेन देशमुख, तर सचिवपदी भीमाशंकर वाघमारे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद जिल्हा प्रेस क्लबची बैठक ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीत प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दिव्य मराठीचे ब्युरो चीफ चंद्रसेन देशमुख यांची तर सचिवपदी दैनिक पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी भिमाशंकर वाघमारे यांची सार्थ निवड करण्यात आली.

या बैठकीस दैनिक एबीपी माझाचे संपादक राहुल कुलकर्णी, लोकसत्ता आणि दैनिक संचारचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर, दैनिक संघर्षच संपादक संतोष हंबीरे, दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी चेतन धनुरे, दैनिक संघर्षचे बातमीदार सुभाष कदम, दैनिक सकाळचे श्री तानाजी जाधवर, दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक प्रवीण पवार, दैनिक एकमतचे जिल्हा प्रतिनिधी अमित सोमवंशी, दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत कावरे, दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी कमलाकर कुलकर्णी, दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवणे, दैनिक सुराज्यचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश गायकवाड, प्रशांत कावरे, न्यूज नेशनचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर, तरुण भारतचे बातमीदार चित्रकांत हजारे, यांच्यासह विविध दैनिकातील बातमीदार आणि कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –