चंद्रशेखर आझाद यांनी नव्या पक्षाच्या नावाची केली घोषणा, उत्तर प्रदेशातील राजकारणचं ‘समीकरण’ बदलणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : २०२२ मध्ये होणाऱ्या यूपी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय आधार शोधत असलेल्या भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी रविवारी (१५ मार्च) नोएडामध्ये नवीन पक्षाची घोषणा केली. ‘आझाद समाज पार्टी’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या नव्या पक्षाच्या घोषणेपूर्वी यूपीमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोना विषाणूमुळे एका दिवसाची नोटीस बजावल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यक्रमास जिल्हा प्रशासनाने दिलेली परवानगी रद्द केली. नंतर कार्यकर्त्यांच्या हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमास परवानगी देण्यात आली.

दरम्यान, ६ दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती, जी त्यांना देण्यात आली होती. यानंतर त्यांनी शनिवारी एसीपीची भेटही घेतली. ते असेही म्हणाले होते की ते इनडोअरमध्ये कार्यक्रम करू शकतात परंतु आदल्या दिवशी प्रशासनाने कार्यक्रमस्थळी नोटीस चिकटवून ही परवानगी रद्द केली. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे आपण कोणतीही जाहीर सभा किंवा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम घेऊ शकत नाही. त्यामुळे भीमा आर्मीचे समर्थक आणि कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

दरम्यान, २०२२ मध्ये होण्या यूपी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर यांच्या या निर्णयामुळे पश्चिम उत्तर प्रदेशच्या राजकारणात एक नवीन समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सहारनपुरात दलित आणि ठाकूर यांच्यात झालेल्या संघर्षानंतर भीमा आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर चर्चेत आले होते. सहारनपूर कारागृहातून सुटल्यानंतर ते केंद्र व यूपी सरकारला सतत आव्हान देत आहेत. अलीकडेच चंद्रशेखर यांनी बुलंदशहर गाठले होते आणि जाहीर सभांना संबोधित केले. या दरम्यान बसपाचे डझनभर नेते पक्षात सामील झाले. यामध्ये शिकारपूरचे माजी आमदार वासुदेव बाबा, डिबाई येथून निवडणूक लढविले वीरेंद्र कुमार, मंडल को ओर्डीनेटर मदन पाल गौतम, माजी जिल्हाध्यक्ष वीरसिंह गौतम, माजी मंत्री धर्मेंद्र गौतम आणि माजी डीएम बीपी नीलरतन यांचा समावेश आहे.