भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलिसांनी भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड.चंद्रशेखर आझाद यांना ताब्यात घेतले आहे. वरळीतील जांबोरी मैदानात त्यांची जाहीर सभा होणार होती. मुंबई पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा आझाद यांनी आरोप केला होता. कोणत्या कायद्यानुसार कैदेत ठेवण्यात आले आहे, असा प्रश्नही त्यांनी पोलिसांना विचारला होता. ते मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये थांबले होते.

आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यांना पोलिसांनी बाहेर पडू दिले नाही, असे आझाद यांनी सांगितले.

आझाद हे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यभरात त्यांच्या विविध ठिकाणी ५ सभा होणार असून आज पहिली सभा ही जांबोरी मैदानात ४ वाजता होणार आहे. दरम्यान त्यांना ऐकण्यासाठी राज्यातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार असल्याचे भीम आर्मीकडून सांगण्यात येत आहे.

बुलेट ट्रेनसाठी १ इंचदेखील जमीन देणार नाही : मेवाणी