Chandrashekhar Bawankule | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा छगन भुजबळांवर घणाघात; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना औरंगजेबाच्या नावापुढे ‘जी’ लावल्यामुळे टीकेला सामोरे जात असणाऱ्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या (Chandrashekhar Bawankule) आणखी एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. छगन भुजबळांचा डोळा तर अजित पवारांच्या विरोधीपक्षनेते पदावर आहे. असे विधान त्यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Chandrashekhar Bawankule)

छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जाणता राजा म्हणण्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. याबाबत आज (दि. ६) पत्रकारांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) यावरून छगन भुजबळांवर चांगलाच निशाना साधला. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘छगन भुजबळ बोलले की शरद पवार जाणता राजा आहेत. शरद पवार यांच्या कामाबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र या जगामध्ये फक्त एकच जाणता राजा आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असे बोलून छगन भुजबळ यांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्ष नेते पदावर आहे. म्हणून आपले गुण वाढवण्यासाठी, त्यांच्या नजरेत नंबर वन राहण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी छगन भुजबळ शरद पवार यांना जाणता राजा म्हणत असावेत.’ अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) छगन भुजबळांवर केली आहे.

तसेच, यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचा देखील चांगलाच समाचार घेतला.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले,
केवळ पक्षाने सांगितल्यामुळे अजित पवारांचे आज पुणे येथे जंगी स्वागत करण्यात आले.
अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असं म्हणून मोठा पराक्रम केला आहे.
म्हणून स्वागत केलं जात आहे. मात्र अशा पराक्रमातला लोक निवडणुकीत योग्य जागा दाखवतील असेही यावेळी
ते म्हणाले. अजित पवारांविरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन झाले आहे.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असं अजित पवारांनी म्हटलं म्हणून महाराष्ट्राची जनता पेटणार नाही का?
तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना काहीही म्हणणार मग भाजप कशी गप्प बसणार?
असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले,
महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जे काही होत आहे ते योग्यच आहे.
जितेंद्र आव्हाड नौटंकी आहे, स्टंटबाज आहेत, आपल्या मतदारसंघातलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी सतत असे वक्तव्य करत राहतात.

Advt.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | ajit pawar made a feat by saying that chhatrapati sambhaji maharaj is not a dharmaveer ncp workers are under pressure says chandrashekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Railway Bharti | राज्यातील दहावी पास तरूणांसाठी सेंट्रल रेल्वेकडून मोठे गिफ्ट; २४२२ जागांसाठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पध्दत

Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ आशयाचे स्टिकर