Chandrashekhar Bawankule | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘मविआ’ला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदार संघातील तांबे पिता-पुत्रांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळे डॉ. सुधीर तांबे (Dr.Sudhir Tambe) यांना काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. यावरून भाजप (BJP) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवर देखील भाष्य केले आहे.

भाजप सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार का? त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘सत्यजीत तांबेंनी अजून कुठलंही समर्थन मागितलेलं नाही. त्यांनी समर्थन मागितलं, तर केंद्रीय संसदीय समितीकडे तशी संमती मागण्याचा आम्ही प्रयत्न करू, तसेच यावर पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपा सध्या अपक्षाच्या भूमिकेतच आहे. आमचं समर्थन कुणाला असणार आहे, हे काळ ठरवेल.’ असे सुचक विधान त्यांनी यावेळी बोलताना केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची जाहिरात ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात आल्याचे त्यांना विचारले असता. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘सामना हे त्यांचं घरगुती वृत्तपत्र आहे. या चित्रपटात दिग्दर्शक तेच आहेत. निर्माते तेच आहेत. वाचणारे आणि पाहणारेही तेच आहेत. त्यामुळे तो घरगुती चित्रपट झालाय. जाहिरात प्रत्येक वर्तमानपत्रात जात असते. त्यामुळे जाहिरातीचा आणि बातम्यांचा काही संबंध नाही. कोणत्याही विचारांचं वर्तमानपत्र असलं, तरी त्यांना जाहिरात जात असते. त्यात विचार करण्यासारखं काही कारण नाही.’ असे यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीस टोला लगावला होता.
ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचे, ‘एक दिल के टुकडे हुए हजार, कही कहा गिरा, कही कहा गिरा’, अशी अवस्था झाली आहे.”

काँग्रेस पक्षाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘काँग्रेसमध्ये बूथ लेव्हलपर्यंत कुणी काम करायला
तयार नाही. नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
त्यांना हे समजलंय की २०४७ पर्यंत काँग्रेसला काही चांगले दिवस नाही.
त्यामुळे ३०-३० वर्ष काँग्रेसमध्ये राहून कुणालाही आयुष्य खर्ची घालायचं नाहीये.
तिथे आजही हीच परिस्थिती आहे की नेत्याचा मुलगाच काँग्रेसचा आमदार होऊ शकतो.
मंत्र्याचा मुलगाच मंत्री होऊ शकतो. आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार होऊ शकतो.
अजूनही नेते आपापल्या मुलांना प्रमोट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे छोटे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.’
असा घणाघात त्यांनी काँग्रेस पक्षावर बोलताना केला.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | bjp chandrashekhar bawankule mocks mva ncp sanjay raut congress on satyajit tambe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Davos World Economic Forum 2023 | दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार; एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती

Pune District Planning Committee | पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य नियुक्त; 20 जणांचा समावेश

Sanjay Raut | ‘फडणवीस बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही,’ संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सूचक विधान

Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना