Chandrashekhar Bawankule | ‘मला वटतं शरद पवारांनी…’ शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा खोचक सल्ला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली. यानंतर कसब्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवाराने विजय मिळवल्यानंतर मतदारांमध्ये भाजप विरोधी भावना असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलेल्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच बावनकुळे यांनी शरद पवार यांना खोचक सल्ला ही दिला आहे.

 

काय म्हणाले शरद पवार
शरद पवार यांनी सकाळी बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत कसबा पेठ पोटनिवडणुकीवर (Pune Kasba Peth Bypoll Election) बोलताना म्हणाले, हा बदल आहे. आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरुन फक्त दोन ठिकाणी भाजपला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजप मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) जास्तीची मतं मिळाली आहेत. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होतं.

 


काय म्हणाले बावनकुळे?
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, चिंचवडमध्ये दोघांच्या मतांची बेरीज केली तरी आम्ही पुढे आहोत. आम्ही 51 टक्क्यांची लढाई जिंकली आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) 51 टक्क्यांची लढाई जिंकून निवडून आल्या आहेत. एकीकडे चार टक्के मागे पडलो आहोत. ही चार टक्के मते भरुन काढण्याची जबाबदारी आमची आहे. यासाठी पुन्हा जनतेमध्ये जाऊन जनतेला विश्वासात घेऊ. आमच्याकडून काही चुकलं असेल तर ते दुरुस्त करु.

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, मला वाटतं शरद पवारांनी काल तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील. त्यांनी आज ते बघून घ्यावेत, असा खोचक सल्ला बावनकुळे यांनी दिला. संपूर्ण काँग्रेस (Congress) साफ झाली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) माध्यमातून पक्ष जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र उलट पक्ष कमी झाला. तीन राज्य हातातून गेली. शरद पवार जे सांगत आहेत ते कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी सांगत आहेत, असा टोला बावनकुळे त्यांनी लगावला.

 

संजय राऊतांचाही घेतला समाचार
चिंचवडमध्ये भाजपचा विजय नसून जगताप पॅटर्नचा विजय असल्याचे विधान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते.
या विधानावर बोलताना बावनकुळे म्हणाले, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा विजय भाजपचा विजय नाही
तर मग तिकडे महाविकास आघाडीचा आहे का? तिकडे धंगेकर यांचा विजय आहे.
धंगेकर हे दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नव्हते. त्यामुळे कसब्यात धंगेकरांच्या बाजूने सहानुभूतीची लाट होती.
त्याठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली नसून उमेदवारांमध्ये लढत झाली आहे.
आमचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | bjp chandrashekhar bawankule mocks sharad pawar ncp on kasba bypoll election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandeep Deshpande | संदीप देशपांडेवरील हल्लाप्रकरणी दोन जणांना अटक; भांडुपमधून केली अटक

NCP Chief Sharad Pawar | देशात सरकार बदलण्याचा मूड, आगामी बदलांसाठी ‘ही’ गोष्ट अनुकूल; शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Prison Department | आता विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले