Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची सरकारवर टीका, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागारानेच सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे जगजाहीर केली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली (Police Officers Transfer) करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाने (ED) सुरु केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचाही ईडीने जबाब नोंदवला आहे. त्यानंतर राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Former Chief Secretary Sitaram Kunte) यांचाही ईडीने जबाब नोंदवला. त्यामध्ये कुंटे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख अनधिकृत याद्या (Unauthorized Lists) पाठवायचे, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे भाजपने (BJP) सरकार टीकास्त्र सोडले आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

 

आपल्या माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे विद्यमान प्रधान सल्लागारानेच ईडी सारख्या जबाबदार यंत्रणेला आपल्याच सरकारमधील माजी गृहमंत्र्यांबद्दल स्फोटक माहिती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांना स्पष्टीकरण देणे आवश्यक झाले आहे. प्रधान सल्लागाराने आपल्याच सरकारमधील एका सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे अशी जगजाहीर केली आहेत त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माननीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना काय उत्तर देतील ?’, असा सवाल ही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विचारला आहे.

ईडीसमोर काय म्हणाले सीताराम कुंटे ?
सीताराम कुंटे यांनी ED समोर दिलेल्या जबाबात असे म्हंटले आहे की, गृहमंत्रीपदी अनिल देशमुख असताना पोलिसांच्या बदल्यासाठी ते मला याद्या पाठवायचे त्यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. या याद्या देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांच्यामार्फत पोहोचवल्या जात होत्या. गृहमंत्र्यांच्या अधीन राहून काम करत असल्याने मी दिलेल्या याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. देशमुखांकडून आलेली यादी ही पोलीस आस्थापना मंडळाच्या (Police Establishment Board) सर्व सदस्यांना दाखविली जात असे. इतकंच नाही तर ही यादी देशमुखांकडून आली असल्याचे मंडळाच्या सदस्यांना मी स्वत: तोंडी सांगायचो. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यामध्ये या नावांचा समावेश केला जायचा, असेही कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | BJP leader chandrasekhar bavankule sitaram kunte uddhav tahckeray mlc bavankule slams mahavikas aghadi goverenment over kuntes statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा