Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचे पवार-ठाकरेंना आव्हान, ‘उदयनिधींच्या विधानाला समर्थन असावे, मान्य असेल तर…’

मुंबई : Chandrashekhar Bawankule | तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी (Udhayanidhi) यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याचा राजकीय वापर करून देशभरातील भाजपा नेते इंडिया आघाडीतील घटक पक्षांना अडचणीत आणू पहात आहेत. आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उदयनिधी यांनी हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीविषयी केलेल्या वक्तव्याला शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे समर्थन असावे. मान्य नसेल तर त्या वक्तव्याचा निषेध करीत इंडिया आघाडी सोडावी. सत्तेच्या लालसेपोटी हिंदू धर्म व संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर ठाकरे व पवार मांडीला मांडी लावून बसत आहेत, असे बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारी बाबत बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा मिळविण्यासाठी महायुतीमधील पक्षांशी बोलणे सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांचा कार्यकाळ आणि देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा तर शिंदे यांच्या सव्वा
वर्षाच्या कार्यकाळात केलेली कामे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत.

ते पुढे म्हणाले, संघटनात्मक बांधणी करून लोकसभा निवडणुकीत ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळविण्याचे भाजपाचे
उद्दिष्ट आहे. पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड जागावाटपाचा निर्णय घेईल. जागावाटप संदर्भात चर्चेतून तोडगा काढू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा झोन पाचमधील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा

Vijay Wadettiwar | ‘सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले’, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप