Chandrashekhar Bawankule | निवड चुकली हे शरद पवारांना आता कळलं, उद्धव ठाकरेंबद्दल भाजपनं डिवचलं (व्हिडिओ)

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) वाद मागील काही दिवसांपासून चव्हाट्यावर येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) मधून मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मविआ मधील या वादावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी निशाणा साधला आहे. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, आपली निवड चुकली होती, असं आता शरद पवार यांना कळालं, त्यांनी उद्धव ठाकरे यांची निवड चुकीची केली होती. जो व्यक्ती पक्ष सांभाळू शकत नाही, तो तीन पक्षांचा नेता कसा? असं आता शरद पवारांना काळालं. याची कल्पना उद्धव ठाकरे यांना आली आणि त्यामुळेच सामनामधून शरद पवारांबद्दल लिहिलं जातं, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

सामानाचं काय करावं?

गुजरातमधून मुली बेपत्ता झाल्याच्या वृत्तावरुन सामनामधून केंद्र सरकारवर (Central Government) टीका करण्यात आली. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, सामनाचं काय करावं? यमदुताने खोटं बोलण्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) यांची नियुक्ती केली आहे. आमच्यासोबत होते तेव्हा गुजरात मॉडेलवर (Gujarat Model) अग्रलेख लिहिले जायचे, असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवारांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताच नेता आमच्या संपर्कात नव्हता, कोणाशी कोणतीच चर्चा झाली नाही, पण तरीही अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल संशय निर्माण करण्यात आली. कदाचित अजित पवार मविआमध्ये वरचढ ठरत असल्याने त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न मविआमधील लोक करत असतील, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

अशोक चव्हाण काँग्रेसमध्येच राहणार

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Congress Leader Ashok Chavan) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा
सुरु होती, मात्र बावनकुळे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अशोक चव्हाणांसोबत अशी कोणतीच चर्चा झाली नाही. त्यांची आणि माझी भेट झाली नाही. ते आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहणार आहेत, असा दवा त्यांनी केला. तसेच चव्हाणांनी बजरंग दलाबाबत (Bajrang Dal) भाष्य करु नये, त्यांना महागात पडेल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

म्हणून आव्हाड बोलत आहेत

केरळ स्टोरी चित्रपटाच्या (The Kerala Story) निर्मात्याला फाशी दिली पाहिजे, असे विधान राष्ट्रवादीचे
आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी केले आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले,
जितेंद्र आव्हाड केरळ स्टोरी चित्रपटाच्या विरोधात बोलले नाहीत, तर मुब्र्यातून निवडून येऊ शकत नाहीत,
मताच्या राजकारणासाठी आव्हाड असं बोलत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | BJP leader chandrashekhar bawankule targets uddhav thackeray over sharad pawar biography

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या कर्नाटकातील प्रचारावरुन शरद पवारांचा टोला, म्हणाले – ‘केंद्रातून जो…’

Prithviraj Chavan | ‘मी बरंच सहन केलंय, शरद पवार…’, पवारांच्या खोचक टीकेला पृथ्वीराज चव्हाणांचे प्रत्युत्तर

Pune PMC Property Tax News | आता मिळकत कर थकबाकीदारांकडे महापालिकेचा मोर्चा ! मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सील करणार, चेंज ऑफ युज केलेल्यांची व्यावसायीकांची आकारणी करणार