Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे चंद्रकांतदादांचे ते विधान चुकीचे’, भाजपने स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते (BJP Leader) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल चंद्रकांतदादांनी केलेले विधान चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच ती त्यांची व्यक्तिगत भूमिका असून त्याच्याशी पक्षाचा संबंध नसल्याचे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना स्पष्ट केलं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीसह (NCP) ठाकरे गटाने भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.

रामजन्मभूमीचं आंदोलन हा मोठा विचार होता. शिवसैनिक (Shiv Sainik) त्याठिकाणी नव्हते असं म्हणणं चुकीचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे या आंदोलनाला समर्थन होतं. कारसेवक वेगवेगळ्या राज्यांमधून आले होते असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटलं आहे. तसंच चंद्रकांत पाटील यांची ती भूमिका व्यक्तिगत आहे. पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही, असंही बावनकुळे यांना म्हटले.

बावनकुळे पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी बाबरी मशिदी (Babri Masjid) संदर्भात मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. जेव्हा रामजन्म भूमीचं आंदोलन (Shri Ram Janmabhoomi Agitation) सुरु होतं तेव्हा सर्व कारसेवक हे प्रभू रामाचं मंदिर बनलं पाहिजे या भूमिकेत होते आणि तिथे पोहचले होते. बाळासाहेब ठाकरे यांचं या आंदोलनाला समर्थन होतं त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हते असं म्हणणं चुकीचं असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की,
बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नव्हता असा दावा त्यांनी केला आहे
. त्यावेळी ढाचा पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो.
जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल
(Bajrang Dal) तिथे होतं? कारसेवक कोण होते? हे जनरलाईज करण्याची गरज नाही. कारसेवक हे हिंदू होते.
कारसेवक हे बजरंग दालाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही.
सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की हेच करु शकतील आणि त्यांनी ते केलं.
ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापी शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | bjp maharashtra president chandrashekhar bawankule says chandrakant patil statement wrong

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

CM Eknath Shinde Threat Call | ‘मी एकनाथ शिंदेंना उडवणार आहे’, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी ! पुण्यातून धमकीचा कॉल, मुंबईतील एकजण अटकेत

PM Kisan | १४व्या हप्त्याची मोठी अपडेट! या महिन्यात येऊ शकतात पैसे, तयार ठेवा हे डॉक्‍यूमेंट