Chandrashekhar Bawankule | ‘धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम’ – चंद्रशेखर बावनकुळे

कराड : पोलीसनामा ऑनलाईन – कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा मेळावा (Dhangar Caste) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिथे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उपस्थित होते. यावेळी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘धनगर समाजाचा इतिहास वैभवशाली आहे. संघटित समाजच संघर्ष करू शकतो, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर या समाजाने केवळ पारंपारिक व्यवसायात न अडकता उच्चशिक्षित पिढी तयार केली पाहिजे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी भाजप सदैव त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.’

 

पुढे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप (BJP) नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. गोपीचंद पडळकर सन २०१९ मध्ये अजित पवारांच्या विरोधात लढले. आम्ही त्यावेळी त्यांना शब्द दिला होता, तो आम्ही पाळला. त्यांना आमदार केले. गत अडीच वर्षात पडळकरांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करुन सोडले होते. त्याचप्रमाणे कराड दक्षिणमधील विरोधकांना तुम्ही संघशक्तीने सळो की पळो करून लावा. भाजप तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच तुमच्या पाठीशी राहील.’

या कार्यक्रमाला चंद्र शेखर बावनकुळेंसह भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol),
विक्रांत पाटील (Vikrant Oatil), सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore),
भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर (Vikram Pavaskar), सातारा लोकसभेचे प्रभारी डॉ.अतुल भोसले (Atul Bhosale),
धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam), रामकृष्ण वेताळ (Ramkrishna Vetal) उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी काँग्रेसवर (Congress) हल्ला केला,’आजचा हा मेळावा धनगर समाजाच्या भावना समजावून घेण्यासाठी आयोजित केला आहे.
गेली चाळीस-पन्नास वर्षे काँग्रेसची सत्ता असूनही धनगर समाजाचे प्रश्न आहे विलंबित राहिले आहेत.
तुमचा फक्त मतांसाठी वापर करून घेण्यात आला. तुम्ही यापुढे तसा वापर होऊ देऊ नका.
फक्त भाजपच तुम्हाला न्याय देऊ शकतो हे लक्षात घ्या.’

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | bjp stands behind dhangar community chandrasekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Apurva Nemlekar | ‘त्या’ प्रश्नावर चाहत्याला अपूर्वा नेमळेकरचे सडेतोड उत्तर; नक्की काय म्हणाली अपूर्वा नेमळेकर…

Sania and Shoaib Divorce | शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची चर्चा पण दोघांनी केली ‘ही’ घोषणा

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले – ‘…तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल’