Chandrashekhar Bawankule | अजित पवारांवरील टिकेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पक्षातील नेत्यांनाच शेवटची वार्निंग; म्हणाले…

Chandrashekhar Bawankule | BJP state president Chandrashekhar Bawankule's last warning to party leaders over his criticism of Ajit Pawar; said...
ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar NCP) काही आमदार सोबत घेऊन महायुतीत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून (BJP Leaders) अजित पवारांना सातत्याने लक्ष्य करण्यात आले. जनसन्मान यात्रेच्या (Jan Sanman Yatra) दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते.(Chandrashekhar Bawankule)

तसेच भाजपच्या अनेक बैठकांमध्ये महायुतीत अजित पवार सहभागी असतील तर प्रचार करणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. तसेच पक्षातील नेत्यांकडूनही अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शेवटची वॉर्निंग दिल्याचे समोर आले आहे. संघाने अजित पवारांसोबतच्या युतीवर भाष्य केल्यानंतर भाजपातील काही नेते उघडपणे अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत होते. त्यावर बावनकुळेंनी नेते, कार्यकर्त्यांना समज दिली आहे.

बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या कुठल्याही पक्षाबद्दल भाजपा कुठल्याही नेत्यांनी अवाजवी बोलू नये.
केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्वाने महायुती स्वीकारली आहे. खालीही ती स्वीकारावीच लागेल. मी शेवटची वॉर्निंग दिली आहे.
यापुढे कुणीही महायुतीतील नेत्यांबद्दल बोलायचे नाही.
महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि मोदींसोबत काम करण्यासाठी आहे.
कुणीही भाजपा कार्यकर्ता यापुढे महायुतीच्या नेत्यांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Mohan Bhagwat | खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

Sri Sri Ravi Shankar | मॉरिशसने गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे हार्दिक स्वागत केले ! “मला मॉरिशसला जगाच्या आनंदाच्या निर्देशांकात वर गेलेले पाहायचे आहे”- गुरुदेव

Total
0
Shares
Related Posts