Chandrashekhar Bawankule | ‘पटोलेंचा दावा म्हणजे उंटावरून…’; भाजप प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस प्रदेश कार्यकार्यणीच्या सभेत नागपूर येथे बोलताना काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाची राज्यात स्वबळावर सत्ता येवू शकते असा दावा कार्यकार्यणीच्या दरम्यान बोलताना केला होता. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाना पटोले यांना खोचक टोला लगावला आहे. त्यात त्यांनी पटोलेंच्या वक्तव्यावर चांगलाच निशाना साधला. ते आज दि. ११ नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. (Chandrashekhar Bawankule)

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, ‘काँग्रेस पक्ष जर स्वबळावर निवडून येत असेल, तर त्यांचे अभिनंदन आहे. त्यांनी स्वबळावर लढावं आणि सत्तेत येऊन दाखवावं.’ असे बोलत एकप्रकारे नाना पटोलेंना चंद्रशेखर बावनकुळेंनी आव्हानच दिले आहे.

तसेच यावर पुढे बोलताना ते म्हणाले, ‘२०२४ मध्ये सत्तेत कोण येईल? हे जनताच ठरवेल. “त्यांचे हे विधान म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे”, असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. नाना पटोले यांनी सध्या काँग्रेसची जी वाताहत होते आहे, त्याकडे लक्ष द्यावं. ‘भारत जोडो’ यात्रा ज्या भागातून केली, त्याच भागात रोज काँग्रेस कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. काँग्रेसमध्ये नेत्यांना वाटतं की आपण असुरक्षित आहोत. अशा परिस्थितीत नाना पेटोले सत्तेत येण्याची स्वप्र कोणत्या आधारावर बघत आहेत, याबाबत कल्पना नाही.’ असा टोला देखील त्यांनी यावेळी बोलताना नाना पटोले यांना लगावला.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षक मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत शिंदे गटासोबत आपले कुठलेही मतभेद नाहीत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करूनच उमेदवार दिले आहेत. असे देखील ते म्हणाले.

दरम्यान, नागपूर येथे काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की,
‘शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेसमधून बाहेर पडत नवीन पक्ष स्थापन केला.
पण, काँग्रेस पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार पुण्यातील कार्यालयात गेले होते.
तेव्हा शरद पवार यांनी सांगितलं की, काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही.
काँग्रेसला संपवायला अनेकजण निघाले होते. ती संपली तरच आपण जिवंत राहू ही कुरघोडी सातत्याने चालते.
पण, त्यांनाही मान्य करावं लागलं, काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे.
राहुल गांधींच्या यात्रेनंतर लोकांचं समर्थन पुन्हा काँग्रेसला मिळत आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करून शकते, अशी परिस्थिती आहे.
असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule criticized nana patole for statement in congress leader meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yogesh Kadam Accident Case | ‘माझ्या मुलाला गाडीसह दरीत ढकलण्याचा कट होता’, रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

Indian Railway New Facility | प्रवाशांसाठी खुशखबर ! जनरल तिकिटावर करू शकता स्लीपर कोचमध्ये प्रवास, लागणार नाही एक्स्ट्रा चार्ज

Pune Crime News | यात्रेत गावगुंडांचा हवेत गोळीबार, 4 जणांना अटक; मावळमधील घटना