Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे यांची अजित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया, म्हणाले- “अजित पवार काय करतील याचा नेम नाही…”

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे. आज सातारा (Satara) येते पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘अजित पवार (Ajit Pawar) काय करतील याचा कोणालाच नेम नाही. ते काय सांगितलं आणि काय बोलतील हे फक्त अजित पवारांनाच माहित असते.’

अजित पवार नाराज असल्यास राज्यातील सत्तेची समीकरणे बदलतील का, असा प्रश्न विचारला असता बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘अजित पवार नेमकं काय करतील? हे ना तुम्हाला कळेल…
ना आम्हाला कळेल… ते केव्हा बाहेर येतील आणि काय बोलतील, हे कुणीच सांगू शकत नाही.
ते काय सांगतील आणि काय करतील, हेही केवळ अजित पवारांनाच माहीत असते. ते भारतीय जनता पार्टीला (BJP) कसे माहीत असेल,
ते सर्व अजित पवारांनाच माहीत.’

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु होती.
शिर्डी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) शिबिरात अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजारी असताना
सुद्धा उपस्थित राहिले होते, पण अजित पवार तेथे नसल्याने चर्चेला अधिकच उधाण आले होते.
आज अजित पवार प्रसारमाध्यांसमोर येऊन ते नाराज नसून ते फक्त खासगी परदेशी दौऱ्यासाठी गेले होते, असे सांगून चर्चेला शांत करण्याचा प्रयत्न केला.

Advt.

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule on ajit pawar upset and political crisis in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update