Chandrashekhar Bawankule | अजित पवार असे खोटे बोलून स्वत: ची उंची कमी करुन घेत आहेत – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेले चार दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल बोलताना म्हटले होते, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत बोलताना मला माझ्या राज्यात परत जायचे म्हणतात. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांना प्रतिप्रश्न केला आहे. राज्यपालांनी अजित पवारांना हे नेमकं कधी सांगितलं, हे त्यांनी आधी सांगावं. उगाच खोटं बोलू नये, अशा प्रकारे खोटं बोलून ते त्यांची उंची कमी करुन घेत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

 

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेले विधान योग्य नाही, हे सर्वांनी आता मान्य केले आहे. त्यांच्या विधानाचे कोणीही समर्थन करत नाही. पण, गेल्या 15 दिवसांपासून ज्याप्रकारे त्यांच्याबाबत बोलण्यात येत आहे, ते योग्य नाही. राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन काम सुरू केले होते. त्यामुळे एका विधानावरून त्यांच्या वयावर, त्यांच्या वृद्धावस्थेवर बोलण्यात आले, हे योग्य नाही.

 

राज्यपालांविषयी बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगायला हवे.
अजित पवार म्हणतात, राज्यपालांना परत त्यांच्या राज्यात जायचे आहे, असे ते खासगीत म्हणाले.
अजित पवार राज्यपालांना कधी भेटले, त्यांनी त्यांना हे कधी सांगितले, हे आधी त्यांनी जाहीर करावे.
उगाच काहीतरी बोलू नये. त्यामुळे अजित पवार त्यांची उंची कमी करुन घेत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule reaction on ajit pawar statement on governor bhagat singh koshyari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले