Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrashekhar Bawankule | काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून विविध प्रतिक्रिया राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारले असता, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबाबत एक मोठे विधान केले आहे. जर बाळासाहेब थोरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना तुम्ही पक्षात घेणार का? असा सवाल त्यांना विचारला असता, त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, कुणालाही भाजपमध्ये यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत. अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो. जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो. पण बाळासाहेब थोरात भाजपात (BJP) प्रवेश करतील, अशी शक्यता मला वाटत नाही. बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस (Congress) आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले होते. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या भाजप प्रवेशावर दिली.
तर काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहाबद्दल बोलताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, ‘बाळासाहेब थोरात यांनी नऊ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते पक्षात दुखावत असतील तर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बाळासाहेब थोरात यांच्याएवढ्या उंचीचा नेता जर माझ्यावर नाराज झाला असता तर मी नक्कीच त्यांचा विचार केला असता किंवा त्यांवर चिंतन केले असते. मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी यावर विचार करायला हवा.’ असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना भाजपमध्ये येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव दिला नाही.
त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. एक युवक नेता विधानपरिषदेत येत असेल तर त्याला मदत केली पाहिजे.
म्हणुनच सत्यजीत तांबे यांना स्थानिक पातळीवर भाजपच्या सहकाऱ्यांनी मदत केली.
याचा अर्थ आम्ही त्यांना काही ऑफर दिली आहे, असा होत नाही.
पण सत्यजीत तांबे यांना कधी वाटले की, त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे.
तर भाजप त्यांना कधीही प्रवेश देईल. सत्यजीत तांबे यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे असतील.
असे देखील यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Web Title :-Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule reaction on congress leader balasaheb thorat joins bjp
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update