Chandrashekhar Bawankule | पुढील मुख्यमंत्री कोण? बावनकुळेंनी नाव आणि शपथविधीचं ठिकाणही केले जाहीर

भंडारा : Chandrashekhar Bawankule | पुढच्या वर्षी, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होईल. त्यानंतर ३० नोव्हेंबरच्या आत राज्यात नवीन सरकार बनेल. २०२४ ते २०२९ या पाच वर्षांसाठी राज्यात नवीन सरकार येईल. या नवीन सरकारसाठी पुन्हा एकदा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शपथ घेतली पाहिजे, असा दुसरा संकल्प प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मांडला. तर पहिला संकल्प नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

भंडारा येथे भाजपाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेकदा या संकल्पाची उजळणी कार्यकर्त्यांकडून करून घेतली.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, या मेळाव्यात पहिला संकल्प करायचा आहे की येत्या
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच मे २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान
बनवायचे आहे. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ खासदार त्यांच्या
समर्थनात असायला पाहिजे. त्यातला भंडाऱ्याचा खासदार सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मोदी यांना पंतप्रधान
करण्या करता हात वर करून उभा असला पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | राऊतांचा EVM वर संशय, म्हणाले – ”लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या”

Harshvardhan Patil | पुणे : हर्षवर्धन पाटलांनी उघड केले सध्याचे घसरलेले राजकारण, ”कोणाचा करेक्ट कार्यक्रम…”

Pune Crime News | एकटेपणातून वृद्धाने उचललं टोकाचं पाऊल, कोथरुड परिसरातील घटना