Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची; शरद पवारांवर खोचक टीका, म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंवर जादूटोणा…’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) 2019 सालच्या विधानसभा निवडणुका एकत्र लढले होते. पण त्यानंतर त्यांच्यात मंत्रीपदांवरुन वाद होऊन ते वेगळे झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापना झाली. त्या वेळेपासून भाजप आणि महाविकास आघाडी वाद सुरु आहेत. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर अडीच वर्षापूर्वी जादूटोणा केला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.

 

बावनकुळे सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, शरद पवारांनी अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता. त्यात उद्धव ठाकरे पुरते फसले आणि विचार न करता ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने आता पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न बघू नये. बेईमानीतून सत्ता बनविण्याचा प्रयत्न अडीच वर्षांपूर्वी त्यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा करण्यात आला होता. मात्र, आता आम्ही सतर्क झालो आहोत. 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात आम्ही 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार आहोत. त्यामुळे आता कोणीही सरकार स्थापन करण्याचे स्वप्न बघू नये. तसेच शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आला की, त्याची सुटका होत नाही, असे देखील बावनकुळे म्हणाले.

यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याचे म्हटले आहे.
अजित पवार नेमके काय करतील, हे कोणालाच कळू शकत नाही.
ते काय बोलतात आणि काय करतात, हे फक्त अजित पवार यांनाच माहिती असते, असे बावनकुळे म्हणाले.

 

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | chandshekhar bawankule criticized uddhav thackeray and sharad pawar in satara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘शिवसेना आगामी काळात मोठा लढा उभा करेल’ – संजय राऊत

Rajiv Gandhi Case | राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Jitendra Awhad | “इतिहासाचे विकृतीकरण नको…”; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया