Chandrashekhar Bawankule | रवी राणा- बच्चू कडू यांच्यातील वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिटवतील – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्या वादावर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपले मत दिले आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद गैरसमजावर आधारीत आहे. लोकांच्या सांगण्यावरून वाद होतात. कडू आणि राणा दोघेही चांगले कार्यकर्त्ये आहेत. दोघेही आपल्या मतदार संघात प्रभावी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोघांसोबत चर्चा करुन मार्ग काढतील, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

 

यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलेल्या मागणीवर देखील भाष्य केले. अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी (Indian Currency) नोटांवर गणपती आणि लक्ष्मीच्या प्रतिमा लावण्याची मागणी केंद्र सरकारकडे केले होती. त्यावर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, त्यांनी मागणी केली. हा त्यांचा अधिकार आहे. पण ज्यावेळी नोटाबंदी झाली आणि बाजारात नवीन नोटा आल्या, तेव्हा देखील त्यांच्यावर महात्मा गांधी यांचीच प्रतिमा होती. त्यांच्या मागणीला तथ्य नाही.

 

केजरीवाल आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही मागणी करत आहेत. केजरीवाल जाणीवपूर्वक हिंदुत्वादी नेता होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दिल्लीतील लोक आता त्यांना कंटाळले आहेत. त्यामुळे इकडून तिकडून काही हिंदुत्ववादी मते आपल्याला मिळतील, याचा ते प्रयत्न करत आहेत. जबाबदार मुख्यमंत्र्यांना अशी विधाने शोबत नाहीत. यापूर्वी ते हिंदू विरोधी राहिले आहेत. निवडणूक काळात त्यांनी हिंदू देव-देवता विरोधी अनेक विधाने केली आहेत. त्यामुळे ही सर्व त्यांची नाटके आहेत.

काँग्रेसने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) ‘ब’ टीम असल्याचा दावा केला आहे.
हे आरोप बावनकुळे यांनी फेटाळले. गुजरात आणि पंजाबमध्ये ते आमच्या विरोधात आहेत.
त्यामुळे ते आमचे नाहीत. ते आमचे कट्टर विरोधक आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | Chief Minister and Deputy Chief Minister will settle Ravi Rana-Bachchu Kadu dispute – Chandrasekhar Bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Terence Lewis | मला मॅसेजद्वारे शिवीगाळ केली…, नोरा फतेहीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणात कोरियोग्राफरचा खुलासा

MLA Bachchu Kadu | रवी राणा आणि बच्चू कडू यांनी समजुतीने घेतले पाहिजे – आ. श्रीकांत भारतीय

Virat Kohli | विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात रचला इतिहास; ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा मोडला ‘तो’ रेकॉर्ड