Chandrashekhar Bawankule | राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, भाजप आक्रमक; बावनकुळेंचा इशारा, म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राहुल गांधींची (Rahul Gandhi) तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केल्याबद्दल काँग्रेसने (Congress) तातडीने देशाची माफी मागावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवारी दिली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बोलत होते.
| LIVE |📍मुंबई | माध्यमांशी संवाद https://t.co/0ZATg8gn5u
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 23, 2023
बावनकुळे म्हणाले, काँग्रेस पक्षाकडून प्रसारित केल्या गेलेल्या एका व्हिडिओत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली आहे. या प्रकाराबाबत काँग्रेसने तात्काळ देशाची माफी मागावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी याविरोधात आंदोलन करेल असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला.
शरद पवारांनी दिशाभूल करु नये
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी
महाराष्ट्राची दिशाभूल करु नये. मुंबईत बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) घडवणाऱ्या देशद्रोही
दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) टोळीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक
यांना अटक केली आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर केलेल्या आरोपांचा आणि मलिक
यांच्या अटकेचा काहीच संबंध नाही. मात्र शरद पवार यांना जनतेची दिशाभूल करण्याची सवय आहे.
याच सवयीतून त्यांनी मलिक यांच्या अटकेबाबत चुकीची माहिती दिली आहे.
पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जनतेत अशा पद्धतीने संभ्रम पसरवू नये, असे सूचक इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
अन्यथा न्यायालयकडे तक्रार करणार
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोर्टाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर
(Bail Granted) केला आहे. देशमुखांवरील आरोपांची सुनावणी न्यायालयात अद्याप सुरु असताना खुद्द
अनिल देशमुख न्यायालयाबाबत मतप्रदर्शन करत असून हा न्यायालयाचा अवमान होत आहे.
देशमुख यांनी यासंदर्भात जाहिर वक्तव्ये करणे थांबवावे अन्यथा न्यायालयाकडे त्यांची तक्रार करु,
असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुख यांना दिला आहे.
Web Title : Chandrashekhar Bawankule | comparison of rahul gandhi with chhatrapati shivaji maharaj makes bjp angry state president chandrashekhar bawankule gets aggressive
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा