Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक

जळगाव : Chandrashekhar Bawankule | पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा कधीही विचार केला नाही. तो विचार सर्वात आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक आहेत, असा दावा भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.

२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमचे सरकार पाडले नसते, तर भाजप सत्तेत आली नसती आणि मराठा आरक्षण देण्याचा प्रश्‍न तेव्हाच सुटला असता असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस
यांनी कायदा केला. पण, या नतद्रष्टांनी मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे, हे मांडण्याची पद्धत चुकवली. जेव्हा हे प्रकरण अंतिम टप्प्यात होते, तेव्हा हे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री झोपी गेले होते का?

बावनकुळे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार
(Shinde-Fadnavis Government) प्रयत्नशील आहे. ओबीसींच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न
लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | मारहाण करुन नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; म्हाळुंगे परिसरातील घटना

Pune Police MCOCA Action | पीएमपी चालकाचा खून करणाऱ्या सोमनाथ कुंभार व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 92 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

MLA Bacchu Kadu | भुजबळांकडून ५ कोटींचा बोभाटा; बच्चू कडूंनी सांगितलं फक्त इतक्याच मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात