×
Homeताज्या बातम्याChandrashekhar Bawankule | मला वाटतंय नाना पटोलेंनाच लम्पी आजार झालाय, मोदींवरील टीकेला...

Chandrashekhar Bawankule | मला वाटतंय नाना पटोलेंनाच लम्पी आजार झालाय, मोदींवरील टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिले प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | गायींना होणारा लम्पी आजार (lumpy Skin Disease) सध्या देशात पसरला असून यामुळे मोठ्या प्रमाणात गायींना लागण होत आहे. पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने विरोधक मोदी सरकारवर (Modi Government) टीका करत आहेत. दरम्यान, काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नायजेरियातून आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला आहे. मोदींवर केलेल्या या टीकेला आता भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उत्तर दिले आहे.

 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, नाना पटोले मागील दोन चार महिन्यापासून ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, त्यातून मला असे वाटतेय की लम्पी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा. त्यामुळे त्यांनाच डॉक्टरांकडे पाठवून त्यांची तपासणी करण्याची गरज आहे. नाना पटोले हे मीडियाची स्पेस मिळविण्याकरीता, राहुल गांधीच्या जवळ जाण्याकरता व तसेच आपले अध्यक्षपद टिकविण्याकरता असे वक्तव्य नेहमीच करत राहतात.

 

दरम्यान लम्पी आजाराबाबत नाना पटोले यांनी म्हटले होत की, लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे.
देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावर आलेले ठिपके सारखेच आहेत.
मोदी सरकारने जाणून बुजून शेतकर्‍यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले.
महागाई, बेरोजगारी हे देशासमोरील सध्याचे सर्वात मोठे संकट आहे पण मोदी सरकारच्या काळात नोकर्‍यांची निर्मिती करण्याऐवजी आहे त्या नोकर्‍या संपवण्याचे काम केले गेले.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | i think nana patole has lumpy disease bjps counterattack by chandrashekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | 6 ऑक्टोबर रोजी ‘नैसर्गिक शेती’ कार्यशाळेचे आयोजन

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News