Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आपल्या परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार (MLA) सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुढे म्हणाले, एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भिती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भिती बाहेर दिसू नये, यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या (CM) काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

https://www.facebook.com/photo?fbid=652202879595957&set=a.547254246757488

 

यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकापाठोपाठ एक चार ट्विट करुन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात.माझे वडील शेतकरी आहेत.
आई-वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडवले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा (Crime) आहे का? असा सवाल करतानाच माझ्या कुळाचा उद्धार करुन उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | my family is my responsibility uddhav thackeray sees no one buthis family chandrasekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shambhuraj Desai | मॉलमध्ये वाईनविक्री सुरु करण्याबाबत शंभूराज देसाईचे संकेत; मविआ सरकारच्या काळात विरोध करणारे फडणवीस देणार का होकार?

Health Tips | रोज सकाळी पोट होत नसेल स्वच्छ, अवलंबा ‘हे’ 8 उपाय, पोटात जमा झालेली घाण होईल दूर