
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, भविष्यात उद्या काय होईल…
पुणे : Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar | आज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही टिकेल, हे सांगता येत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी बोलताना केले होते. यानंतर राजकीय वर्तृळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar)
चंद्रशेखर बाबवनकुळे म्हणाले, भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहीत नसते. उद्या काय होईल? किंवा तुमचा-माझा उद्याचा दिवस कसा असेल? हे कुणालाच माहीत नसते. त्यामुळे अजित पवारांचे विधान हे नैसर्गिक विधान आहे. ते राजकीय विधान नाही. (Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar)
एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले होते की, टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच खरेदी विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही.
ते म्हणाले, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना
यांचीही ताकद वाढली पाहिजे. तिथे चुका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update