Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 Muslim leaders will take charge of Lok Sabha campaign; Information of Chandrasekhar Bawankule

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | महाराष्ट्रातील सर्व लोकसभा क्षेत्रात ४८ मुस्लिम नेत्याची नियुक्ती केली जाणार असून ते मोदी सरकारच्या योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात भाजपाला मत देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections)

ते पुणे येथे माध्यमांशी संवाद साधत होते. मुस्लिम समाजात पंतप्रधान मोदींबद्दल आत्मियता असून समाजाने भारत यशस्वी होत असल्याचे पाहिले आहे, यामुळे मोदीजींनाच मते मिळतील असे सांगून बावनकुळे म्हणाले की, महायुतीचे सरकार खेळीमेळी व समन्वय साधून लोकहिताचे निर्णय घेत आहेत. सरकारमधील सर्वांसाठी सत्ता ही गौण तर राष्ट्रहित महत्वाचे आहे. मोदीजी आत्मनिर्भर भारत व्हावा यासाठी प्रयत्न करीत असून त्यांना साथ देण्यासाठीच पक्ष एकत्र आले आहेत. (Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections)

विधानसभा अध्यक्षांसमोर उद्यापासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहेत. उबाठा गटाकडून दोन वकील बाजू मांडणार आहेत. तर ५०० पानी उत्तर दाखल करण्यात आले आहे, यावर बोलताना श्री बावनकुळे यांनी राहुल नार्वेकर हे उत्कृष्ठ वकील आहे असे सांगितले. ते मेरीटचे विद्यार्थी असून ते मेरीटवरच निकाल देतील. ते कोणतिही गटबाजी किवा कुणावरही अन्याय होणार नाही, असा निकाल देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमताने निर्णय झाला. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा यासह पूर्ण सरकारच तेथे गेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी तीन दिवसांच्या राजस्थान यात्रेवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रक्षा खडसेचे काम सर्वोत्कृठ

रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात सर्वोत्कृष्ठ काम केले आहे.
त्यांचा मतदारसंघात संपर्क चांगला असून सरकारच्या योजना पोहचविण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत.
त्यांच्यासमोर कुणीही उमेदवार असला तरी त्या दोन लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील,
अशा विश्वास श्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.

  • ते असेही म्हणाले
  • उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी स्टॅलीनचे वक्तव्य त्यांना मान्य आहे का? हे महाराष्ट्राला सांगावे, मान्य नसेल तर इंडिया आघाडी सोडणार का?
  • इंडिया आघाडी सोडणार नसाल तर तुमचे हिंदुत्व बेगडी, तुष्टीकरण करणारे

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Total
0
Shares
Related Posts