Chandrashekhar Bavankule On NCP | ‘भाजप प्रवेशासाठी 10 आमदारांची यादी तयार, उर्वरीत राष्ट्रवादी लवकरच…’ – चंद्रशेखर बावनकुळे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule On NCP | भाजपमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डावलले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर उत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादीचा सूर्योदय झाला होता. परंतु ते महायुतीमध्ये सहभागी झाल्याने अनेकजण अस्वस्थ आहेत, कारण अजित पवार राष्ट्रवादीत नसल्याने उर्वरीत राष्ट्रवादीचा सूर्यास्त झाला आहे, अस्त होत आहे. त्यातूनच राहिलेल्या राष्ट्रवादीमधून अजितदादांना डावलले जात असल्याची भाषा सुरू झाली आहे. (Chandrashekhar Bawankule On NCP)

भाजपा खासदार सुजय विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविजय-२०२४ अभियाना अंतर्गत घरघर चलो यात्रेची सुरुवात नगर शहरातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणखी १० आमदारांच्या प्रवेशाची यादी तयार आहे, असाही दावा केला. मात्र हे आमदार कोणत्या पक्षाचे आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. (Chandrashekhar Bawankule On NCP)

बावनकुळे म्हणाले, अजित पवार हे कर्तृत्ववान नेते असून त्यांना कोणी डावलू शकत नाही. महायुतीत ते सहभागी झाल्याने काहीजण अस्वस्थ झालेत. त्यातूनच अशी वक्तव्य करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये मोठे स्थान असलेले अजित पवार बाहेर पडल्याने राष्ट्रवादीत अंधःकार झाला आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीच्या दृष्टीने भाजपचा बी प्लॅन तयार आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, त्याची आवश्यकता नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निष्णात वकील असून ते विधानसभेच्या परंपरा, पद्धतीचे पालन करून योग्य निर्णय घेतील.

बानवकुळे पुढे म्हणाले, सरकारला २२५ हून जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याने ते भक्कम आहे. सरकारला काही अडचण नाही. रोज अनेकजण पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त करतात. १० आमदारांची यादी आजच तयार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गट, अजितदादा गट यांचे स्थान काय? या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, आमची महायुती आहे. ही युती सन्मानजनक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये १३ घटक पक्ष आहेत, त्या सर्वांचा सन्मान ठेवला जाईल.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून सतत पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर होत
असलेल्या टीकेबाबत बावनकुळे म्हणाले, इंडिया आघाडीची भूमिका रोज बदलतेय.
इंडियामधील उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदुधर्म हद्दपार करण्याची, संपवण्याची भाषा केली.
त्याबद्दल राहुल गांधी यांची काय भूमिका आहे, हे प्रथम जाहीर करावे. काँग्रेसकडे कुठलाही मुद्दा नाही,
ते केवळ संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या रक्तातच कर्करोग आहे.

बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनाही मी तीनदा प्रश्न विचारला, ज्या हिंदुत्वाचा मुद्दा ठाकरे उपस्थित करतात,
तो हिंदू धर्म हद्दपार करण्याची भाषा इंडिया आघाडीतील उदयनिधी यांनी केली,
त्यांच्यासोबतच ठाकरे यांनी युती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरगरिबांचे नेते आहेत, कैवारी आहेत,
हे राहुल गांधी यांनी लक्षात घ्यावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’