Chandrashekhar Bawankule On Vikram Gokhale Death | विक्रम गोखले यांच्यासारखा श्रेष्ठ कलावंत, विचारवंत आता आपल्यात नसण्याची उणीव नेहमी जाणवत राहील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule On Vikram Gokhale Death | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीवरील एक महान आणि मोठा कलावंत गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. त्यांच्या निधनावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विक्रम गोखले यांच्यासारखा श्रेष्ठ कलावंत, विचारवंत आता आपल्यात नसण्याची उणीव नेहमी जाणवत राहील, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. (Chandrashekhar Bawankule On Vikram Gokhale Death)

बावनकुळे लिहितात, “ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी, हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान मिळविले होते. त्यांच्याबद्दल साऱ्यांनाच वाटत असलेली आदरयुक्त भीती हा मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होता. चित्रपट सृष्टीसारख्या मायावी जगाच्या पलीकडेही एक जग आहे आणि त्या जगातील सामान्य माणसांच्या वेदनेसोबत जगण्याशी आपण एकरूप व्हायला हवे, हे मूल्य त्यांनी आयुष्यभर जोपासले. या श्रेष्ठ कलावंत, विचारवंताच्या नसण्याची ही उणीव नेहमी जाणवत राहणार आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.” (Chandrashekhar Bawankule On Vikram Gokhale Death)

पुण्यात 30 ऑक्टोबर 1947 रोजी विक्रम गोखले यांचा जन्म झाला होता.
त्यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला होता. ते त्यांच्या चौथ्या पिढीतील अभिनेते होते.
त्यांच्या पणजी आणि आजी मराठी अभिनेत्र्या होत्या. शनिवारी (दि. 26 नोव्हेंबर) त्यांनी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती.
मागील दोन दिवस त्यांच्यावर कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (व्हेंटिलेटर) उपचार सुरु होते.
विक्रम गोखले यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत नाटक, चित्रपट मालिका असे विविध विषय हाताळले.
सर्व क्षेत्रात त्यांचा ठसा अढळ आहे. अनेक सुप्रसिद्ध आणि गाजलेल्या चित्रपटांत त्यांच्या अजरामर भूमिका आहेत.
त्यांच्या जाण्याने एक मोठा आणि आधाराचा माणूस गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.

Web Title :-  Chandrashekhar Bawankule On Vikram Gokhale Death | vikram gokhale passed away in pune bjp maharashtra chief chandrashekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikram Gokhale Death | विक्रम गोखले यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि उध्दव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

Baba Ramdev Controversy | ठाण्यातील वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची रामदेव बाबांना नोटीस