Chandrashekhar Bawankule | ‘2024 पर्यंत मोठे नेते भाजपात येणार, पुण्यातही होणार बदल’, बावनकुळेंचे संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 2024 पर्यंत भाजपात (BJP) मोठे नेते येतील. राज्यात ब्लास्ट झालेला दिसेल. खूप मोठे नेते भाजपात येतील. कसब्याचा बदला आम्ही घेणार आहोत. 30 तारखेपर्यंत पुणे भाजपात (Pune BJP) मोठे बदल होतील, असे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले. पुण्यात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ठाकरे गटांच्या (Thackeray Group) आरोपांना प्रत्युत्तर दिले.

म्हणून आम्ही कसबा हारलो

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आम्ही 2024 च्या निवडणुकीत चांगला विजय मिळवू. मोदींच्या नेतृत्वात 2024 मध्ये देशात पुन्हा सरकार आणू. राज्यात 35 लाख कार्यकर्ते काम करणार आहे. भाजप कागदावर कधीच बोलत नाही 3 विरुद्ध एकची लढाई होती म्हणून आम्ही कसबा हरलो. मात्र आता युती म्हणून आम्ही तयार आहोत. कसब्याचा बदला आम्ही काढणार असून 30 तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

राऊतांना निवडणुकीत कळेल

संजय राऊतला (Sanjay Raut) मुंबईत कुणी आलं की त्याची सेना किंचित होते. त्याचे नेते भाजपात येतील ही त्यांची भीती आहे. जे.पी. नड्डा (JP Nadda) सगळीकडे फिरत आहेत. संजय राऊत यांना मिरची यासाठी लागली की आम्ही म्हणालो की, मुंबई आम्ही जिंकू, बघू कोण हारतं कोण जिंकतं, घोडे मैदान लांब नाही. राऊतांना निवडणुकीत कळेल की जे.पी. नड्डा काय आणि कोण आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

कुरुलकर-वानखेडे प्रकरणावर प्रतिक्रिया

हनी ट्रॅप प्रकरणात (Honey Trap Case) अटकेत असलेले कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांची चौकशी सुरु आहे.
त्यात बोलणं योग्य नाही. राष्ट्रवादीने (NCP) आपलं घर तपासून पाहावं, चौकशी सुरु आहे. सत्य समोर येईल.
कुटुंबातील किंवा परिवारातील कोणी गुन्हा केला, तर त्याला शिक्षा भोगावी लागेल.
त्यासाठी कुटुंबाला किंवा परिवाराला जबाबदार धरता येणार नाही, असे सांगत बावनकुळे प्रदीप कुरुलकर
यांच्या आरएसएस (RSS) संबंधाबाबत सारवासारव केली.

तर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे. गुन्हा करणाऱ्यांना कडक
शासन झालेच पाहिजे. जे कायद्याचे बाहेर जातील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.

Web Title : Chandrashekhar Bawankule | other party leaders will come to bjp by 2024 say chandrashekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | 16 आमदारांच्या अपात्रतेविरोधात संजय राऊतच पुरावा ठरणार?, अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाची काय असणार रणनिती?; मंत्री शंभूराज देसाई म्हणाले…

Malshej Ghat Closed | निसर्गरम्य माळशेज घाट आता दर गुरूवारी बंद, ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | अदानी ग्रुपचा मोठा निर्णय ! एनडीटीव्ही सुरू करणार विविध भारतीय भाषांमध्ये 9 न्यूज चॅनेल