Chandrashekhar Bawankule | ‘मी भाजपची, पण पक्ष थोडीच माझा आहे’, पंकजा मुंडेच्या विधानावर बावनकुळे म्हणाले- ‘पंकजाताई भाजप…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत झालेल्या रासपच्या (Rashtriya Samaj Party) कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ‘मला लोक म्हणतात पक्ष माझा. पण मी भाजपची (BJP) आहे. पण पक्ष माझा नाहीये.’ असं विधान केलं होतं. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच म्हणाल्या, असं बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले.

 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे म्हणाल्या, मला लोक म्हणतात पक्ष माझा. पण मी भाजपची आहे. पण पक्ष माझा नाहीये. भाजप पक्ष खूप मोठा आहे. याशिवाय, आम्हाला काहीच (Maharashtra Politics News) नाही मिळालं तर मी जाऊन ऊस तोडायला आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) जातील मेंढ्या चरायला. तसेच रासप माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झालं तर मी भावाच्या घरी जाईन, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

त्यांच्या विधानाचा विपर्यास केला

पंकजा मुंडेंच्या विधानवर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केला जात आहे. मी त्यांचं भाषण ऐकलं आहे. पंकजाताई यांनी भाजपबद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असं वक्तव्य केलं आहे. त्या भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. त्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत, पक्षाच्या जनसंपर्क अभियानात त्या सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशात त्यांच्या अनेक सभा होत आहेत. त्यामुळे कोणत्या विषयाला धरुन त्याबाबत संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नेहमी त्यांच्यासोबत बोलत असतो. त्या काहाही बोलल्या तरी त्याचा विपर्यास केला जातो, असं मला वाटतं.

 

आमचा पक्ष अरबी समुद्रासारखा

Advt.

भाजपमधील इनकमिंग बाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा पक्ष महासागर आहे, अरबी समुद्र सारखा आहे. या महासागरामध्ये कितीही लहान-मोठे, कोणत्याही पक्षातलं नेतृत्व आलं तरी आमच्याकडे खूप जागा आहे. आमच्याकडे प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे सेल आहेत. पस्तीस प्रकोष्ठ आहे. किसान आघाडी, महिला आघाडीसारख्या नऊ आघाड्या असल्याचे बानवकुळे यांनी सांगितले.

 

निवडणूक युती म्हणून लढवणार

48 लोकसभेच्या (Lok Sabha) आणि विधानसभेच्या (Legislative Assembly Elections) 288 जागा युती म्हणून लढायच्या आहेत.
त्यामुळे कोणीही पक्ष आला तरी त्याच्या क्षमतेनुसार त्याला काम देण्यासाठी आमच्याकडे स्पेस आहे.
ज्या ज्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये यायचं आहे त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी भाजपमध्ये यावं आम्ही महासागरासारखं त्यांना सामावून घेऊ, असंही बावनकुळे यांनी म्हटलं.

 

 

Web Title :  Chandrashekhar Bawankule | pankaja munde said that bjp is with
me says bjp maharashtra president chandrasekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा