Chandrashekhar Bawankule | ‘…आणि म्हणुनच सत्यजीत तांबे महाविकास आघाडीत जाणार नाहीत;’ चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrashekhar Bawankule | विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुक (Graduate and Teacher Constituency) जाहीर झाल्यापासूनच नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) कमालीचा चर्चेत राहिला. मात्र आता या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला असून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पराभूत केले. काँग्रेस (Congress) पक्षासोबत बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत पक्षनेतृत्वाने तांबे पिता-पुत्राला पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी ही निवडणुक लढली. यात त्यांना भाजपने देखील पाठिंबा दिला. त्यावर सत्यजीत तांबे हे आता परत काँग्रेस पक्षात जातील. याबाबत चर्चा सुरू झाली असतानाच, मी अपक्ष निवडणुक लढवली आहे आणि मी अपक्षच राहणार. अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी जाहीर केली आहे. मात्र यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सत्यजीत तांबे हे कधीही महाविकास आघाडीत जाणार नाहीत. असे वक्तव्य केले आहे. ते आज पत्रकारांशी संवाद साधत होते.

 

काल (दि.०४) पत्रकार परिषदेदरम्यान माध्यम प्रतिनिधीने सत्यजीत तांबे यांना प्रश्न विचारला की, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपाला? त्यावर तांबे म्हणाले की, ‘मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढलो आणि यापुढेही मी अपक्षच राहणार.’

 

तर, सत्यजीत तांबे हे परत काँग्रेसमध्ये जाणार नाहीत, असा विश्वास भारतीय जनता पार्टीला देखील वाटतो. असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘सत्यजीत तांबे हे अपक्ष होते म्हणून आम्ही त्यांना मदत केली. भारतीय जनता पार्टीच्या पाच जिल्ह्यांमधील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी तांबे यांना समर्थन दिलं. तांबे यांना आमच्या पक्षाने केवळ मदत केली.’

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात आघाडीकडून उमेदवार दिला गेला होता.
सत्यजीत तांबे हे आघाडीच्या उमेदवाराविरोधात निवडूण आले आहेत.
त्यामुळे ते आता परत महाविकास आघाडीमध्ये परत जाणार नाहीत.
तर, आम्ही ती निवडणुक लढणार नाही.
हे आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यामुळे सत्यजीत तांबे हे अपक्ष असल्यामुळेच आमच्या पक्षाने त्यांना समर्थन दिले.
असे मत यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

 

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | satyajeet tambe will not join
maha vikas aghadi says chandrashekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा