Chandrashekhar Bawankule | अनेक संस्थांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष बनले, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात तीन दिवसांचे वगनाट्य चालल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. शरद पवार यांनी राज्यातील अनेक शिक्षण संस्था आणि सहकारी संस्थांच्या घटना (Constitution) बदलुन त्याचे अध्यक्षपद मिळवल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

 

चंद्रशेखर बावनकुळे पुणे शहराच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (City President Jagdish Mulik), प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), गणेश बिडकर (Ganesh Bidkar), हेमंत रासने (Hemant Rasane) उपस्थित होते.

 

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचा घरगुती तमाशा महाराष्ट्राने अनुभवला. राजीनामा नाट्य हे त्या तमाशामधील हे वगनाट्य होते. राष्ट्रवादीने चालविलेला एपिसोड हा पूर्णपणे स्क्रिप्टेड होता. सर्व गोष्टी ठरवून केल्या जात होत्या हे सर्वांना समजत देखील होते.

शरद पवार मागील 50 वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात आहेत.
शरद पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचा (Rayat Shikshan Sanstha) अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली.
राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत.
त्यामुळे शरद पवार हे दुसरं कोणाला पक्षाचा अध्यक्ष कसा होऊ देतील, असा सवालही बावनकुळे यांनी केला.

 

शरद पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थेची घटना बदलली आणि ते संस्थेचे अध्यक्ष बनले.
याशिवाय त्यांनी अनेक शिक्षण संस्था आणि सहकारी संस्थांच्या घटना बदलून अध्यक्षपद मिळवलं,
असा आरोप बावनकुळे यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता,
असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.

 

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | Sharad Pawar became the president by changing the constitution of many organizations, Chandrashekhar Bawankule alleged

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 1 लाखाची लाच घेणारा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Deepak Kesarkar | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर; मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Sudhir Mungantiwar | ‘अजित पवारांच्या कार्यकाळात मंत्रालयात हजारो दारूच्या  बाटल्या…’, सुधीर मुनगंटीवार यांचा खळबळजनक आरोप