Chandrashekhar Bawankule | विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव म्हणजे फुसका बॉम्ब, बावनकुळे यांनी लगावला टोला (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत कलहाने बंड करून राज्यात शिंदे- फडणवीस हे सरकार सत्तेत आले. शिवसेना पक्षाचे अनेक आमदार त्यावेळी सुरतमार्गे गुवाहाटीत पोहोचले होते. यानंतर काही महिन्यांचा कालावधी लोटत असतानाच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे शुक्रवारी असे काही बोलल्याने राजकारणातील विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विरोधकांनी विधानसभेच्या अध्यक्षांविरोधात मांडलेला प्रस्ताव सभागृहात आला, तर त्यांचे अजून 20 ते 25 आमदार आमच्या पक्षात सामील होतील, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव ठेवून विरोधक त्यांची आपलीच नामुष्की ओढवून घेतील. ज्यावेळी हा प्रस्ताव येईल त्यावेळी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde- Fadnavis Government) 184 पेक्षा जास्त मते मिळतील. त्यात आणखी भर म्हणून की काय विरोधकांचे 20 ते 25 आमदार (MLA) पुन्हा आमच्याकडे येतील, असा दावाही त्यांनी केला.

 

 

हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवशी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणणे म्हणजे फुसका बॉम्ब आहे. विरोधकांमध्येच एकमत नाही, त्यांची भूमिका दोन प्रकारची आहे. सत्तेतील हे सरकार योग्य काम करत आहे. त्यातूनच विदर्भ-मराठवाड्याला न्याय देऊ अशा घोषणा करण्यात आल्या. काँग्रेसचे नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी अडीच वर्षे धानाला बोनस मिळवण्याकरिता, शेतकऱ्यांना 12 तास वीजपुरवठा मिळणेबाबत अजित पवारांच्या (Ajit Pawar) पुढे आपलं नाक रगडलं, तरीसुद्धा त्यांना काही मिळालेच नाही. आज शेवटी सत्तेतील सरकारनेच विरोधकांनी मागणी केली नसली तरीही स्वत:हून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस आणि इतर सर्व घटकांनाही न्याय दिला आहे.

अजित पवारांचे माझे चांगले संबंध
विरोधी पक्षनेते अजित पवार माझे चांगले मित्र आहेत.
आमची मैत्रीपण चांगली आहे; परंतु असे एकाएकी त्यांनी माझ्याविषयी ही भूमिका का घेतली,
याबाबत मला अजूनही उमगलेले नाही, असे बावनकुळे विधान परिषदेत म्हणाले.
अधिवेशनादरम्यान अजित पवार व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत होते.
त्याविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले, बारामती येथे जाऊन मी आमच्या पक्षाच्या उमेदवारास निवडून आणले पाहिजे,
असे आवाहन बारामतीच्या जनतेला केले होते.
त्याबाबत त्यांना वाईट वाटायचे कारण काय? मी तर त्यावेळी त्यांचे नावही काढले नव्हते.
तरीसुद्धा ते माझ्यावर नाराज झाले. आमचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे तेथे आमच्या उमेदवारास निवडून आणायचे होते.
त्यामुळे पवारांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे, आम्ही आमच्या पक्षाचे काम करू.
अजितदादांनी एवढे मनाला लावून घ्यायची गरजच नव्हती. शेवटी जनताजनार्धनच निर्णय करत असते.
राजकारण म्हटले की, किल्ले उद्ध्वस्त होणारच. त्यात आमचे काय आणि त्यांचे काय किल्ले उद्ध्वस्त झालेच.
जनता ठरवेल काय करायचे आणि काय नाही, याबाबत अजितदादांनी एवढी नकारात्मकता दाखवून सभागृहात तो विषय काढण्याची गरज नव्हती, असेही बावनकुळे म्हणाले.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | then opposition partys 20 25 mlas will come with us chandrashekhar bawankule predicted

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांनी शिक्षणमंत्री केसरकर घायाळ; असं काय घडलं नेमकं?

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार

Pune Pimpri ACB Trap | 3 लाखाच्या लाच प्रकरणी पिंपरीतील पोलिस उपनिरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा