Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे पूर्णपणे काँग्रेसमय झाले आहेत, त्यांनी आता फक्त काँग्रेसचे संविधान स्वीकारायचे बाकी ठेवले आहे – चंद्रशेखर बावनकुळे

सातारा: पोलीसनामा ऑनलाइन – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी आता फक्त काँग्रेसचे (Congress) संविधान स्वीकारण्याचे बाकी ठेवले आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सत्तेची स्वप्ने बघणे सोडून दिली पाहिजेत. त्यांना सत्ता गेल्यासारखे वाटत नाही. ते आजही स्वप्नातच आहेत. उद्धव ठाकरेंवर त्यांनीच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) लोकांनी जादूटोण्याचा प्रयोग केला आणि सत्ता हस्तगत केली. पण ती वेळ आता गेली आहे.
आम्ही आता सतर्क झालो आहोत. त्यामुळे ते कधीही सत्तेत येणार नाहीत.
येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत आम्ही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेला जिंकणार आहोत, असे विश्वास बावनकुळे यांनी दर्शविला.

तसेच उद्धव ठाकरे पूर्णपणे काँग्रेसमय झाले आहेत. त्यांनी सर्वार्थाने काँग्रेस स्वीकारली आहे.
त्यांनी फक्त आता काँग्रेसचे संविधान स्वीकारायचे बाकी राहिले आहे.
बाकी सर्व काही गेल्या अडीच वर्षात त्यांनी स्वीकारले आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) उद्धव ठाकरेंवर
अडीच वर्षापूर्वी जादूटोणा केला होता. तेव्हापासून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले आहेत.

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | Uddhav Thackeray has become a complete Congressman, all he has left now is to accept the Congress constitution

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update