Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | uddhav thackeray should take a xerox of the congress constitution says chandrashekhar bawankule
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वत: चा पक्ष संपविण्यासाठी जे जे काही करता येण्यासारखे आहे, ते ते सर्व उद्धव ठाकरेंनी केले आहे, असे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. आ तसेच ठाकरेंनी आता आणखी एक काम करावे, निवडणूक आयोगात जावे आणि तिथे काँग्रेस पक्षाच्या घटनेची झेरॉक्स मिळवावी आणि तीच आपल्या पक्षाची घटना म्हणून स्वीकारून टाकावी, जाहीर करून टाकावी. एवढेच आता त्यांनी बाकी ठेवले आहे, असेदेखील चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

 

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. त्यामुळे सोमवारी या दोनही पक्षांच्या प्रमुखांमध्ये बैठक होणार आहे. त्यावरदेखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागासवर्गीय समाज हा काही कुणाची जहागीरदारी नाही. जो जनतेसाठी काम करतो, जनता त्याच्या पाठीशी ठाम उभी राहते. इथे जात वगैरे पाहिली जात नाही. राज्यात शिंदे फडणवीस सरकार लोकांची कामे करत आहे. त्यामुळे कोणतीही युती, आघाडी झाली तरी आम्हाला त्याचा फार फरक पडत नाही. शिंदे फडणवीस युतीला राज्यात तोड नाही, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यावेळी म्हणाले.

 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्य सरकार नरमाईची भूमिका घेत आहे.
शिंदे फडणवीस सरकार सीमाप्रश्नावर शेपूट घालत आहे. त्यावर त्यांच्याकडे कोणताच तोडगा नाही,
असे आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत. हे आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावले आहेत.
सीमावादावर कोणतीही नरमाईची भूमिका नाही. गेल्या 65 वर्षांत सीमाभागांत विकास झालेला नाही.
त्यामुळे तेथील लोकांना वाटत आहे की, जे सरकार चांगल्या सुविधा देते, ते आपले सरकार.
त्याचमुळे शिंदे फडणवीस सरकारने तिथे जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्यावर जोर दिला आहे, असे बावनकुळे म्हणाले.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | uddhav thackeray should take a xerox of the congress constitution says chandrashekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Total
0
Shares
Related Posts