Chandrashekhar Bawankule | ‘निकाल काहीही आला तरी…’, बावनकुळे यांचे सूचक विधान (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | मागील नऊ महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुनावणी सुरु होती. गुरुवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायालयातील युक्तीवादानंतर राज्यातील सरकार कोसळेल आणि मध्यावधी निवडणूका लागतील असे तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

महाराष्ट्रातील मध्यावधी निवडणुकांच्या तर्क-वितर्कांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, निकाल काहीही आला तरी शिंदे -फडणवीस सरकारला (Shinde – Fadnavis Government) काहीही फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणारच आहे. त्या निकालाबाबत तर्क काढणे किंवा तर्कावर बोलणे हा माझा अधिकार नाही. ते माझं कार्यक्षेत्रही नाही. जो निर्णय येईल तो निर्णय मान्य करुन पुढे जायला पाहिजे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

 

मध्यावधी निवडणुकांबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, दोन गोष्टी मी स्पष्टपणे सांगू शकतो.
कुठल्याही मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. निवडणुका वेळेवर होतील. सरकार पडणार नाही.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हे सरकार 2024 पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण करेल.
विरोधक केवळ आपले कार्यकर्ते आणि आमदार भाजपमध्ये जाऊ नये यासाठी सरकार आता पडणार… उद्या पडणार.. असं चित्र निर्माण करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | ‘Whatever the result…’, Bawankule’s suggestive statement (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 25 हजाराच्या लाच प्रकरणी नायब तहसिलदारासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Pune Crime News | दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वीच खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर