चांद्रयान – 2 : विक्रम ‘लँडर’शी संपर्क होण्याची आशा जवळपास संपुष्टात

श्रीहरीकोटा : वृत्तसंस्था – चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आलेल्या विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र होण्यास सुरुवात झाली आहे.

चंद्रावर काही तासातच लुनर डे संपणार आहे त्यामुळे वातावरण पूर्णपणे बदलणार आहे. त्यानंतर विक्रमशी संपर्क करणे किंवा  त्याचा फोटो देखील काढणे अशक्य आहे. पुढील 14 दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र असणार आहे.  तसेच  तापमान वजा 183 डिग्री सेल्सियस इतके असेल. अशा वातावरणात लँडर विक्रम सुरक्षित राहिल का? हाही मोठा प्रश्न आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्वकांशी चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत विक्रम लँडर 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृ्ष्ठभागावर उतरणे अपेक्षित होते. मात्र चंद्रावर हे लँडर उतरण्याच्या काही मिनिट आधी त्याचा इस्रोशी संपर्क तुटला. विक्रम लँडरने चंद्रावर दिवस असताना सर्व संसोधन करणे अपेक्षित होते. मात्र संपर्क तुटल्याने विक्रम लँडरच्या माध्यमातून कोणतेच संशोधन करण्यात इस्रोला अद्याप यश आले नाही. त्यामुळेच चंद्रावरील या भागात रात्र झाल्यानंतर पुन्हा दिवस होईपर्यंत विक्रम लँडर निष्क्रिय होण्याची शक्यता जास्त असून त्यानंतर पुन्हा त्याच्याशी कधीच संपर्क होऊ शकणार नाही.

Visit – policenama.com