‘चांद्रयान-२’च्या नावाने ‘हे’ जुने फोटो ‘व्हायरल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने अंतराळ मोहिमेत आणखी एक मोठे यश मिळवले आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन म्हणजेच इस्रोने आंतराळात ऐतिहासिक कामगिरी करत चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटा मधील सतीश धवन स्पेस सेंटर मधून या यानाने उड्डाण घेतले तेव्हा साऱ्या देशवासीयांच्या नजरा या क्षणाकडे लागल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच भारतातील नागरिकांनी देखील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत सर्वांना या यशस्वी कामगिरीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेकांनी ट्विटरवरून आनंद व्यक्त करत इस्रोचे अभिनंदन केले.

Chandrayaan-2 के नाम से शेयर हो रही हैं ये पुरानी फोटो

सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी GSLV मार्क III-M१ या प्रक्षेपकाच्या मदतीनं चांद्रयान-२ ने उड्डाण केलं. श्रीहरिकोटा येथून अवकाशात उड्डाण केल्यानंतर ५२दिवसांनी चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल.

Chandrayaan-2 के नाम से शेयर हो रही हैं ये पुरानी फोटो

यानंतर ते १६ दिवस पृथ्वीची परिक्रमा करून चंद्राच्या दिशेनं रवाना होईल. त्यानंतर या यानाचे काही फोटो सध्या व्हायरल होत असून यान अमेरिकेवरून गेल्यानंतर हे फोटो काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे फोटो खरे नसून जुने फोटो व्हायरल केले जात आहेत.

Chandrayaan-2 के नाम से शेयर हो रही हैं ये पुरानी फोटो

या फोटोंविषयी दावा केला जात आहे कि, यात चंद्र दिसून येत असून या फोटोत सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे तीनही दिसत असून यामध्ये चमकणारा सूर्य देखील दिसून येत आहे. मात्र हे फोटो जुने असून सध्या चांद्रयान -२ मोहिमेचे म्हणून व्हायरल केले जात आहेत.

Chandrayaan-2 के नाम से शेयर हो रही हैं ये पुरानी फोटो

दरम्यान, हे फोटो आधीपासून इंटरनेटवर उपलब्ध असून या फोटोंवर विश्वास ठेवू नये. चांद्रयान-२ यानाने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षात प्रवेश केला असून ५२ दिवसांनी चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल.

Chandrayaan-2 के नाम से शेयर हो रही हैं ये पुरानी फोटो

आरोग्यविषयक वृत्त –