चंद्रयान 2 : विक्रम ‘लॅन्डर’ संदर्भात खुशखबर, आता पुन्हा एकदा जागृत झाल्या ‘आशा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ISRO ला चंद्रयान 2 च्या लँडर विक्रमची माहिती पुन्हा मिळण्याची आशा पुन्हा एकदा पल्लवित झाली आहे. याबाबतची अधिक माहिती नासा ने दिली आहे. नासाने म्हंटले आहे की विक्रम लँडर बाबतची नवी माहिती पुन्हा एकदा समोर येणार आहे कारण त्यांचे लूनर रिकनैसेंस ऑर्बिटर (LRO) लवकरच त्या जागेवरून जाणार आहे जिथे विक्रम ने लँडिंग केले होते.

नासाने या आधी देखील सांगितले होते की त्यांचा एलआरओ 17 सप्टेंबर रोजी विक्रमच्या लँडिंग साईट शेजारून गेले होते त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणचे काही फोटो देखील घेतले होते. मात्र त्यावेळी त्यांना विक्रम बाबतचे फोटो घेता आले नव्हते. ज्यावेळी हे सर्व झाले तेव्हा त्या ठिकाणी अंधार होता म्हणून स्पष्ट फोटो घेता आले नव्हते.

ची माहिती मिळू शकते
नासा ने सांगितले की आता ऑक्टोबरमध्ये एलआरओ पुन्हा त्या ठिकाणाहून जाणार आहे आणि तेव्हा त्यावेळी प्रकाश असणार आहे त्यामुळे त्या ठिकाणचे स्पष्ट फोटो घेता येऊ शकणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा विक्रम बाबत माहिती मिळू शकणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

7 सप्टेंबरला विक्रमाशी तुटला होता संपर्क
7 सप्टेंबर ला अर्ध्या रात्री 1.50 वाजता विक्रम लँडरचा चंद्राच्या साउथ पोल वर पोहोचण्याच्या आधी संपर्क तुटला होता. जर सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये विक्रम यशस्वी झाला असता तर रोवर बाहेर आला असता आणि अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झाला असता. चंद्राचा एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांच्या बरोबर असतो. त्यामुळे आता इसरोकडे सात दिवस बाकी आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी