चंद्रयान 2 : चंद्रावर काळे डाग आहेत काय ? ISRO नं केला नवा ‘खुलासा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्रोने चांद्रयान 2 नंतर चंद्राबाबत वारंवार नवीन खुलासे केले आहेत. चांद्रयान 2 चे भलेही सॉफ्ट लँडिंग होऊ शकलेले नाही मात्र चारही बाजुंनी फिरत असलेले ऑर्बिटर अजूनही नवीन नवीन प्रकारचे फोटो देत आहे. 22 ऑक्टोबर रोजी सुद्धा इस्रोने एक असाच फोटो पुढे आणला होता. पहिल्यांदाच इस्रोने चंद्राचे असे रंगीत फोटो सगळ्यांसमोर आणले आहे. या फोटोमध्ये हे समजून येत आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर काळे डाग का आहेत ? तसेच चंद्रावर एवढे खड्डे का आहेत ?

हा खुलासा ऑर्बिटरमध्ये असलेल्या ड्युअल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक एपर्चर रडारने केला आहे. या उपक्रमाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील भागाचा अभ्यास केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोणत्या जागेवर खड्डा आहे आणि कोणत्या जागेवर डोंगर याबाबतची माहिती मिळू शकते. याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य हे आहे की दोन मीटर उंचीवरून देखील हे चंद्राच्या पृष्ठावरील फोटो घेऊ शकते.

कशावरून समजले की चंद्रावर काळे डाग आहेत –

DF-SAR ने पाठवलेल्या फोटो वरून हे समजते की, हे उपकरण चंद्रावरील माहिती देण्यास सक्षम आहे. त्याचप्रमाणे चंद्रावर कोणता खड्डा कधी निर्माण झाला असल्याची माहिती देखील हे उपकरण देते. चंद्रावर काळे डाग आहेत कारण चंद्रावर असलेल्या खड्यांची सावली मोठ्या प्रमाणात पडते आणि परिणामतः ते चंद्रावर काळे डाग असल्यासारखे वाटतात.

कसे तयार होतात चंद्रावर खड्डे –

चंद्राच्या पृष्ठभागावर नेहमी उल्कापिंड, धूमकेतू पडत असतात यामुळेच हजारो वर्षांपासून चंद्रावर खड्डे तयार होत आहेत. DF-SAR हे सुद्धा सांगू शकते की चंद्रावर कोणता खड्डा कधी पडलेला आहे.

1. नव्या खड्ड्याची ओळख

नव्या खड्ड्याचा रंग जास्त चमकदार आणि पिवळ्या रंगाप्रमाणे दिसत आहे. त्याच्या चारही बाजूला ताजी माती आणि धूळ दिसून येत आहे. या खडड्यांच्या आतील रंग चमकदार दिसतो.

2. जुन्या खड्ड्यांचा रंग गडद

चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या खड्ड्यांचा रंग गडद आहे. निळा आणि गडद हिरवा असे खड्डे हे जुने खड्डे आहेत. या खड्ड्यांच्या आतील रंग चंद्राच्या पृष्ठभागाशी मिळता जुळता आहे.

किती प्रकारचे खड्डे बनले आहेत चंद्राच्या पृष्ठभागावर –

DF-SAR च्या माहितीनुसार चंद्रावर कशा प्रकारचे खड्डे बनतात. धूमकेतू चंद्रावर सतत पडत असल्यामुळे व्हर्टिकल (सरळ खोल खड्डा) आणि ऑब्लीक (वाकडे तिकडे खड्डे) चंद्रावर पडतात.

1.व्हर्टिकल खड्डे (सरळ खोल खड्डा) –

क्षुद्र ग्रह आणि धूमकेतू ज्यावेळी चंद्रावर सरळ जाऊन पडतात त्यावेळी अशा प्रकारच्या खड्ड्यांची निर्मिती होते. चारही बाजूंनी असलेली खड्यांची खोली ही सारखीच असते.

2.ऑब्लीक (वाकडे तिकडे खड्डे )-

जेव्हा क्षुद्र ग्रह आणि धूमकेतू वाकड्या तिकड्या पद्दतीने चंद्रावर कोसळतात त्यावेळी या पद्धतीच्या खड्यांची निर्मिती होते. यामध्ये एका बाजूनेच खड्यांची खोली जास्त असते. तर एका बाजूने मोठा उतार असतो आणि सर्व खड्यांची खोली सारखी नसते.

किती खड्डे आहेत चंद्रावर ? –

चंद्रावर किती खड्डे आहेत याचा आकडा जगातील कोणत्याच वैज्ञानिकांडे नाही. परंतु एक अनुमान आहे. चंद्रावर 5185 खड्डे हे 19 किमी पेक्षा जास्त रुंद आहेत. 10 लाख खड्ड्यांची रुंदी जवळजवळ एक किलोमीटर एवढी आहे. 50 लाख खड्डे असे आहेत ज्यांची रुंदी 10 मीटर पेक्षाही अधिक आहे.

Visit : Policenama.com

You might also like