चांद्रयान – 2 बद्दल PM मोदींचे आवाहन – लॅन्डिंग आवश्य पहा, तुमचा फोटो रिट्वीट करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदी आज रात्री चांद्रयान – 2 चे लँडिंग पाहण्यासाठी बेंगळुरुच्या इसरो सेंटरमध्ये वैज्ञानिकाबरोबर उपस्थित असणार आहेत. यावेळी शाळकरी मुले देखील उपस्थित असणार आहेत. मोदींनी इसरोच्या वैज्ञानिकांना अभिनंदन करुन देशावासियांना ट्विट करत आवाहन केले की लोकांनी रात्री चांद्रयान – 2 ची लँडिंग पाहावी आणि त्याचा फोटो काढून ट्विट करावा. ते असे ही म्हणाले की, लोकांनी फोटो रिट्विट करावेत.

मोदींनी ट्विट करत म्हणले आहे की, 130 कोटी भारतीय या क्षणाची वाट पाहत आहेत. त्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक आहे. चांद्रयान – 2 आज रात्री दक्षिणी भागात उतरेल.

पीएम मोदींने लिहिले की हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. ते म्हणाले की त्यांच्या सोबत उपस्थित असलेली मुले ती आहेत ज्यांनी MYGov वर ISRO क्विजमध्ये भाग घेतला होता.

रात्री 1.30 मिनिटांनी चांद्रयान – 2 मधून विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. ही प्रक्रिया 7 सप्टेंबरला सकाळी 5 वाजता होईल. या दरम्यान मोदी स्वत: इसरोच्या सेंटरवर असतील.