ठरलं ! २२ जुलैच्या दुपारी लाँच होणार ‘चांद्रयान’ २ मिशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्त्रो आता सोमवारी २२ जुलैच्या दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान २ मिशन लाँच करणार आहे. इस्रोच्या फेसबुक पेजवर आणि ट्विटरवर ही माहिती देण्यात आली आहे. भारताचे दुसरे चांद्रयान मिशन १५ जुलैला लाँच होणार होते पण काही तांत्रिक कारणास्तव १५ जुलैला लाँच होणारे मिशन स्थगित करण्यात आले. क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम बाटलीत लिकेज आढळल्यामुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली होती.

प्रक्षेपण होण्याच्या आधी ५६ मिनिटे आधी ही मोहीम स्थगित करण्यात आली. क्रायोजेनिक इंजिनमध्ये लिक्विड ऑक्सिजन (ऑक्सीडाइजर) आणि लिक्विड हायड्रोजन (ईंधन) भरल्यानंतर हेलियम भरण्याचे काम सुरु होते.

श्रीहरीकोट्यातील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये देशभरातील ५,००० लोक हे लाॅचिंग पाहण्यासाठी एकत्र आले होते. त्यांना अशाप्रकारची समस्या उदभवेल असे वाटले देखील नव्हते. परंतु एक तास आधी तांत्रिक अडचण उदभवली आणि हे मिशन स्थगित करावे लागले. मिशन अयशस्वी होण्यापेक्षा मिशन अशाप्रकारे स्थगित केल्यामुळे इस्रोचे कौतुक देखील करण्यात आले.

केसगळती होतेय का ? ‘हे’ ६ साधे-सोपे घरगुती उपाय करा

आंब्यातील कोय फेकू नका, उपयोगात आणल्यास करेल औषधाचे काम

‘सुपारी’ खाऊन ‘या’ ४ आजारावर करा कंट्रोल, जाणून घ्या

आरोग्यासंदर्भातील ‘या’ महत्वाच्या ११ प्रश्‍नांची उत्‍तरे आवश्य जाणून घ्या !

सावधान !  लहान मुलं सतत मोबाईल घेत असतील तर ‘हे’ नक्की वाचा

‘या’ ४ घरगुती उपायांनी करा कुरळे ‘केस’ सरळ