‘चांद्रयान 2’ नं पाठवला चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात ‘सुंदर’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने काही दिवसांपूर्वीच चांद्रयान 2 ही मोहिम राबवली होती. ही पूर्णपणे यशस्वी झाली नव्हती. यानंतर आता ISRO चांद्रयान 3 च्या तयारीला लागलं आहे. चांद्रयान 2 मोहिमेचं सर्वांनी कौतुक केलं होतं. चांद्रयान 2 बद्दल सांगायचे झाले तर यातील ऑर्बिटर चंद्राचे नियमित फोटो पाठवत आहे. ऑर्बिटरने चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात सुंदर फोटो पाठवला आहे.

याबाबत सांगताना इस्रोने सांगितलं आहे की, चांद्रयान 2 मधील टेरेन मॅपिंग कॅमेऱ्याद्वारे क्रेटर के थ्री डी क्यु चंद्राचा हा फोटो 100 किमी अंतरावरून घेण्यात आला आहे. या फोटोच्या आधारावर याचा तपास केला जाणार आहे की, चंद्रावर जीवसृष्टी आहे की नाही. चंद्राचा फोटो पाहिला तर लक्षात येईल की, चंद्रावर मोठा खड्डा दिसत आहे. या खड्ड्याचा अभ्यास केला जाईल जो भविष्यातील संशोधनासाठी होऊ शकतो. चांद्रयान 2 मोहिमेत लँडर विक्रमची सॉफ्ट लँडिंग जरी झाली नसली तरी ऑर्बिटर मात्र त्याचे काम सातत्याने करत आहे. चंद्राचे फोटो सातत्याने इस्रोला पाठवत आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये पाठवणार चांद्रयान 3

चांद्रयान 2 ही मोहिम 98 टक्के यशस्वी झाली होती. यानंतर आता इस्रो चांद्रयान 3 च्या तयारीत आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये इस्रो ही मोहिम राबवणार आहे. यात चांद्रयान 2 चा ऑर्बिटर वापरला जाणार असल्याची माहिती आहे. हा ऑर्बिटर 7 वर्षे काम करणार आहे. या मोहिमेत केवळ लँडर आणि रोव्हर पाठवले जाणार आहे. चांद्रयान 3 मोहिमेत लँडरचे पाय अधिक मजबूत असणार आहेत.

Visit : Policenama.com