अभिमानास्पद ! ‘चांद्रयान-2’ चा चंद्राच्या कक्षेत ‘यशस्वी’ प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सकाळी (मंगळवार) चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचेल. याबाबतची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे.

श्रीहरिकोटातील प्रक्षेपणाच्या 29 दिवसांनंतर चांद्रयान- 2 ने आज सकाळी 9.30 वाजता चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राचा आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट आहे.

असा असेल चांद्रयान-2 चा पुढील प्रवास –

पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर इतके आहे. चंद्रापासून 30 किलोमीटरवर गेल्यानंतर ‘चांद्रयान-2 ‘ची गती कमी करण्यात येईल. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळं अनियंत्रित होऊन धडकू नये यासाठी चांद्रयान-2 चा वेग कमी करण्यात येणार आहे.

चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर ‘विक्रम’ उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. हीच शेवटची 15 मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर पुढील 15 मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.

आरोग्यविषयक वृत्त –