चांद्रयान २ : इस्रोचे ट्विट भारतीयांचे मानले आभार, ‘विक्रम’शी संपर्क ‘सस्पेंन्स’ कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने पाठवलेले विक्रम लँडर ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले मात्र त्याचा संपर्क मात्र तुटल्याने मोहीम अर्धवट राहिल्याची भावना निर्माण झाली आहे. मात्र विक्रमची मोडतोड झाली नसून यंत्रणा व्यवस्थित आहे अशी माहिती मिळाल्याने शास्त्रज्ञांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आणि गेल्या १० दिवसांपासून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्रोचे संशोधक करत आहेत. अशातच इस्रोने आज (मंगळवारी) इस्त्रोने एक ट्वीट करत भारतीयांचे आभार मानले आहेत.

काय म्हटले आहे इस्रो ने
मंगळवारी संध्याकाळी ७ च्या दरम्यान इस्रो ने हे ट्विट प्रसारित केले आहे ज्यामध्ये म्हटले आहे, ‘आमच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. जगभरातील भारतीयांच्या आशा, आकांशा आणि स्वप्नांपासून प्रेरणा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत राहू’. याचबरोबर एक फोटोही ट्विटरवर प्रसारित झाला आहे ज्यामध्ये म्हटले आहे “आकाशाला गवसणी घालणारे लक्ष्य ठेवण्यासाठी आम्हाला सातत्याने प्रेरित करण्यासाठी धन्यवाद !” इस्त्रोच्या या ट्वीटचे अनेक लावले जात आहेत. मात्र सध्या विक्रमची संपर्क साधण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी राहिले आहेत . त्यामुळे इस्त्रोने केलेल्या या ट्वीटमुळे सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.

शेवटचे चार दिवस बाकी , अशा कायम
इस्रोसह अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) देखील लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. विक्रमची संपर्क साधण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी राहिले असून यानंतर मात्र संपर्क साधण्याच्या सर्व आशा संपुष्टात येतील. नासाचे चंद्राभोवती फेऱ्या मारणाऱ्या लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटर (LRO) विक्रमच्या लँडिंग साईटवरून मंगळवारी गेले. त्यामुळे संपर्कांच्या आशा वाढल्या आहेत. दरम्यान याबद्दलची माहिती इस्रो किंवा नासाने अजून जाहीर केलेली नाही.