चंद्रकांत पाटील २ नंबरचे धंदे करणारे मंत्री ; राजू शेट्टींचा घणाघाती आरोप

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे, अवैध धंदे करणारे भाजपचे मंत्री आहेत. त्यांनी कोणाकडून किती घेतले. हे मी सिद्ध करतो. असा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यासोबतच चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात यावं आणि चर्चा करावी, मी कुठली सेटलमेंट केली हे सिद्ध करावं. असं आवाहन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना केलं आहे.

राजू शेट्टी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. राजू शेट्टी यांची संपत्ती तीन वर्षात कशी वाढली यावर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात यावे आणि चर्चा करावी, मी कुठली सेटलमेंट केली हे सिद्ध करावं. चंद्रकांत पाटील हेच राज्यातील २ नंबरचे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत. दादांनी कुणाकडून किती घेतले हे मी सिद्ध करतो. अशी टीका त्यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like