महाराष्ट्र : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू तर 6 गंभीर

चांदवड : पोलीसनामा ऑनलाइन – नव्याने खरेदी केलेल्या जमिनीकडे जात असताना काळाने एका कुटुंबावर झडप घातली. हे कुटंब ट्रॅक्टरमधून जात असताना घाटामध्ये एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात ट्रॅक्टरचा चक्काचुर झाला आहे. हा भीषण अपघात आज (शनिवार) दुपारी चांदवड-देवळा मार्गावरील भावड घाटात झाला. जखमी झालेल्यांवर मालेगावच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चांदवड तालुक्यातील पुरी गावातील मधुकर शंकर भवर यांनी देवळाजवळ शेत जमीन खरेदी केली आहे. खरेदी केलेली शेतजमीन पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंब ट्रॅक्टरने शेताकडे जात होते. शेती पाहण्यासाठी जात असलेल्या भवर कुटुंबातील 9 जण ट्रॅक्टरमधून जात होते. भावडी घाटाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरचा पुढचा भाग चक्काचूर झाला.

अपघातामध्ये ट्रॅक्टरवर बसलेल्या 9 जणांपैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये मधुकर पवार यांचा मुलगा विजय, सुन सुनिता, नातू सोन्या आणि त्यांचे व्याही भाऊसाहेब काळे यांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्यांवर देवळा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी चांदवड पोलीस स्थानकात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like