नवं तंत्रज्ञान आलं; आता कोंबडा होईल कोंबडी अन् अंडही देईल, जाणून घ्या तंत्रज्ञान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जे अंडे आपण खातो त्यामागे एक किंमत लपलेली असते. त्यामुळे कोंबडीला विशेष महत्व आहे. पण तुम्हाला माहिती नसेल दरवर्षी जगभरात सुमारे 7 बिलियन म्हणजे 700 कोटी नर पिलांची हत्या केली जाते. होय, पण त्याचं कारणही तसंच आहे.

चिकन इंडस्ट्रीमध्ये नर कोंबड्याची गरज जास्त भासत नाही. सर्वात जास्त गरज भासते ती म्हणजे मादी कोंबड्यांची. कोंबड्या अंडे देतात हे यामागचे कारण असल्याने कोंबड्या मारल्या जात नाहीत. त्यामुळे आता नर कोंबड्यांची होत असलेली ही हत्या रोखण्यासाठी इस्त्रायल देशाच्या स्टार्ट अपने नवं माध्यमं शोधलं आहे. त्यानुसार, अंडे निघण्यापूर्वीच नर कोंबडा मादी कोंबडीत बदलेल.

…तर जाणून घेऊया काय आहे तंत्रज्ञान

जगभरातील कोंबड्या पाळणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती असते, की जितके अंडे कोंबड्या देतात त्यापैकी निम्मे अंडी नर पिल्लांची असतात. या नर पिल्लांना चिकनसाठी पाळण्यासाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असते. त्यामुळे अनेकदा इंग्लंडसारख्या देशात या नर पिल्लांना श्रेडिंग मशिनमध्ये टाकले जाते. तर बहुतांश ठिकाणी नर पिल्लांना गॅस देऊन मारले जाते.

नर कोंबडा देणार अंडे

‘द गार्जियन’ वेबसाईटमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, नर कोंबडा जर अंड्यातून येण्यापूर्वी कोंबडी झाली तर त्याची हत्या होणार नाही. हे पोल्ट्री व्यवसायाला चालना देईल. कोंबडी बनलेले नर कोंबडे या प्रक्रियेनंतर अंडेही देईल. हे नवे तंत्रज्ञान सुरु केलंय इस्त्रायलची स्टार्ट अप कंपनी सूस टेक्नॉलॉजीने.

साउंड व्हायब्रेशनवर काम

सूस टेक्नॉलॉजीने साउंड व्हायब्रेशनच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचे सीईओ याएल अल्टर यांनी सांगितले, की अंड्यांना साउंड व्हायब्रेशनसमोर ठेवले की त्यामुळे नर पिल्लांच्या जीनमध्ये बदल होईल. त्यामुळे त्यांच्या नर अंडकोषात बदल होऊन महिला अंडकोष म्हणजे ओवरीमध्ये बदलेल आणि नर पिल्लाचे रुपांतर मादी कोंबडीत होईल.