पाठदुखीच्या ‘वेदना’ असहनीय आहेत ? तर मग आहारातील ‘या’ सवयी तात्काळ बदला, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –  आपल्या शरीराची जेव्हा अती झीज होते तेव्हा त्याच रूपांतर अंगदुखी मध्ये होत. उदाहरण घ्यायचं झालं तर जास्त चाललो किंवा ओझं बाळगलं तर दुसऱ्याच दिवसापासूनच पाठदुखी किंवा पाय दुखणे सुरु होते. असच जेव्हा आपण जिम मध्ये थाईज किंवा हेवी वेट वर्क आऊट करतो तेव्हा आपण नवीन लोकांना रडताना पहिले असेल,हीच गोष्ट शरीराच्या प्रत्येक भागाला लागू पडते. म्हणून शरीराला त्याची सवय व्हावी यासाठी व्यायाम करा हे सर्रास सांगितलं जात. त्याप्रमाणे काही जण रोज सकाळी व्यायाम सुद्धा करतात.

आपल्या पाठीला सपोर्ट हा लहान लहान अस्थींनी तयार झालेला मणका किंवा कणा स्पिनल कार्ड याचा असतो. त्याची बांधणी जरी लहान लहान हाडांनी झालेली असली तरी हाडाचा सांगडाच ना. म्हणूनच त्याची इतर हाडांप्रमाणे झीज होत असते. त्यासाठी त्याला पोषण आहार सुद्धा तेवढाच गरजेचा आहे.

तसेच काही जण पाठदुखी टाळण्यासाठी पाठीचे व्यायाम करताना दिसतात.मात्र पुन्हा तोच प्रश्न पडतो की आहाराचं काय? गरजेचं आहार घेतला जातो का? पथ्य पाळली जाताट का? नियंत्रित आहार रोजच्या रोज घेतो का? शरीर बांधणी साठी आहार गरजेचं असल्याने हे प्रश्न उदभवणे गरजेचे आहे तर,एकूणच आपल्या पाठदुखी व अंगदुखीला आहारातील कोणत्या गोष्टी जबाबदार आहे ते जाणून घेऊया.

वनस्पती तेल/तूप

वनस्पती तूप अर्थातच डालडा यामध्ये ओमेगा ६ फॅटी ऍसिड हे मोठ्या प्रमाणात असत. शरीराला याची गरज असतेच मात्र हे प्रमाण ३ फॅटी ऍसिड पेक्षा जास्ती वाढलं तर त्याचा परिणाम थेट हाडांवर होतो.हाडांच्या मानाने मणक्यावर जरा लवकरच होतो.म्हणजे पाठ दुखीला निमंत्रण म्हणून,आहारात डालडा वापरायला घरातील स्त्री तरी धजावत नाही. मात्र वनस्पती तेल जर वापरायचं असेल तर ऑलिव्ह ऑइल त्याला उत्तम पर्याय आहे. कारण त्यामध्ये मोनोसॅच्युरिटेड फॅट हे जास्त प्रमाणात असतात.

साखरयुक्त पदार्थ

जवळ जवळ सगळ्याच शरीर संबंधी तक्रारींना कारणीभूत असलेला एकमेव पदार्थ तो म्हणजे साखर.साखरेमुळे वजन वाढत आणि वजन वाढीचा थेट परिणाम पाठीवर होतो.

पॉलीश किंवा रिफाइन केलेलं धान्य.

पॉलिश किंवा रिफायन केलेल्या अन्न धान्यापेक्षा साधे अन्नधान्य खाणे केव्हाही उत्तम. आजकाल मोठ्या प्रमाणात लोक ब्रेड पेक्षा व्होल व्हीट ची मागणी करतात. पिझ्झा,सिरल्स,व्हाईट ब्रेड,हे सर्व पदार्थ रिफाइन केलेल्या गव्हा पासून तयार केलेलं असतात. म्हणून फास्ट फूड खाणारी लोक जाड झालेली दिसतात.खाणारी लोक जड झालेली असतात. रिफाइन केलेल्या धनयमध्ये धान्यांमध्ये शरीरातील इन्सुलिन लेव्हल अतिरिक्त वाढते त्यामुळे वजनात वाढ होते.

दुग्धजन्य पदार्थ

सगळ्यांनाच दुग्धजन्य पदार्थाची अडचण नसते.दूध,पनीर,दही,हे खाणे शरीरासाठी उत्तमच. मात्र एक्सेसिव्हचीज व बटर खाणे हे शरीरासाठी मारकच. पण सर्वांचीच शरीर क्षमता सारखी नसते. दूध पचवणे काही जणांना कठीण जात.त्यामुळे त्याचा ताण पोटावर येतो आणि पोटावर ताण आला की त्याचा परिणाम पाठीवर झाला म्हणून समाजाचं.

प्रक्रिया केलेलं मक्याचे पदार्थ

अलीकडे कॉर्न फ्लिक्स पदार्थ दुधासोबत सकाळी नाश्त्याला खाले जातात.मका शरीराला उत्तम पण तो प्रोस्टेड नसावा.त्यामुळे शरीरातील इन्सुलिन चे प्रमाण वाढते आणि वजनात देखील वाढ होते.

लाल मांस

लाला मांसामध्ये प्रोटीन्स हे खूप प्रमाणात असतात. जे शरीरासाठी उत्तमच. पण तुम्हाला पाठ दुखीचा त्रास होत असेन तर हे खाणे तुम्ही टाळलेच पाहिजे.तसेच त्यामध्ये एन-ग्लायकोली लिनेयुरेनियम (neu5gc) हे मूलद्रव्य सापडतात. जे इन्फ्लामेशन साठी कारणीभूत आहे. याशिवाय सॅच्युरेटेड फॅट हे देखील या मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते जे शरीरास घातक असते.

रसायन युक्त पदार्थ

रसायन युक्त पदार्थ हे आपल्या शरीराला अनभिज्ञ आहेत त्यामुळे आपले शरीर हे पदार्थ कधीही पचवून घेत नाही. त्यामुळे हे पदार्थ शरीराबाहेर देखील फेकले जात नाही.तसेच अनावश्यक मूलद्रव्यसारखे शरीरात चिटकून बसतात.याचा सगळ्यात मोठा परिणाम होतो तो तुमच्या पाठीला,म्हणून या पुढे कधी पॉकेट
खाद्य पदार्थ घ्याल तेव्हा त्यावरचे घटक वाचूनच घ्याल.

पाठ दुखी हे आपल्या रोजच्या जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. त्याचाही इलाज करणे कठीण असून,पाठदुखी कमी करण्यासाठी आणि त्या मूलभूत स्थितीचा उपचार करण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.शेवटी औषोधोपचार व शस्त्रक्रिया देखील आवश्यक असून,परंतु हे विसरू नका की जीवशैलीच्या निवडीमुळे आपल्या वेदनांमध्ये देखील खूप फरक पडतो.

त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे पदार्थ टाळले तर नैसर्गिक रित्या पाठदुखीला राम राम ठोकत येतो. तज्ज्ञांच्या

वाचकांसाठी सूचना : सदर लेखातील माहिती,विविध तज्ज्ञांच्या मतानुसार तसेच मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात येत आहे. ही माहिती प्रसिद्ध करण्यामागचे या विषयाची प्राथमिक स्वरूपात ओळख होणे हाच उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.