खुशखबर ! बँका उघडण्याच्या वेळेत होणार लवकरच बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग डिव्हिजनने देशभरातील बँकांची बैठक घेतली. ही बैठक १० जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बँकेच्या शाखा उघडल्या जाऊ नयेत, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसंच ग्राहकांच्या मते बँका सुरु करण्याची वेळ बदलण्यासाठी माण्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता बँकांच्या वेळेत बदल होणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही खुशखबर असू शकते.

आयबीए ने २४ जूनला ग्राहकांच्या सेवेसाठी उपसमितीच्या बैठकीत बॅंकांच्या वेळेबाबत काही मुद्दे मांडले आहेत. त्यात आयबीएने बँकांच्या शाखा उघडण्याचे तीन पर्याय दिले आहेत. पहिला सकाळी ९ ते संध्याकाळी ३ या वेळेत, दुसरा सकाळी १० ते सायंकाळी ४ आणि तिसरा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत, बँका चालू ठेवण्याचा पर्याय या बैठकीत बँकांना देण्यात आला आहे. त्यामुळे यातून बँका कोणत्या वेळेची निवड करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

३१ ऑगस्टपर्यंत जिल्हास्तरीय ग्राहक समन्वय समितीने वेळ ठरवावी आणि स्थानिक वृत्तपत्रानांही ही माहिती देण्याबाबत, आयबीएने सांगितले आहे. तसंच सप्टेंबरमध्ये बँक उघडण्याची नवीन वेळ बदलण्याची शक्यता असल्याचे सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त