पालकमंत्री रामदास कदम यांच्या बोलण्यात बदलावं : डी पी सावंत

नांदेड:-पाेलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड)- नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेला वाद चव्हाट्यावर आला आहे असे चित्र दिसत आहे. एका महिलेचा अपमान करत पालकमंत्र्यांनी केलेले असभ्य वर्तन अत्यंत चुकीचे असल्याचा उल्लेख आमदार सावंत यांनी केला. त्या महिलेने आपल्या भागातील मंडळी तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत आहे, असे वक्तव्य त्या भागातील जनतेसाठी निधी मिळावा म्हणून केले होते, असे आमदार सावंत म्हणाले.

यावेळी मात्र त्या महिला सदस्यांना रामदास कदम यांनी माझ्या महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही, असे सांगितले होते त्या शब्दांना मात्र बगल दिली. सिडको स्मशानभुमीत कार्यक्रमाला गेलेल्या पालकमंत्र्यांना तेथे कोणीच नसल्याने उपमहापौर गिरडे यांनी नारळ मागवला, त्यानंतर तो नारळ फोडण्यात आल्याची माहिती सांगितली. पण नारळ फोडण्याचा अधिकार पालकमंत्र्यांनी उपमहापौर विनय गिरडे यांनाच दिला होता, हे सांगितले नाही. नांदेडच्या पाणीप्रश्नावर बोलताना युपीपीचे पाणी ही पर्यायी सोय आहे.

पण शासनाच्या नियमाप्रमाणे अगोदर पिण्याचे पाणी, त्यानंतर शेतकरी आणि त्यानंतर उद्योग यांना द्यायचे असते, असे सावंत म्हणाले.
एकूणच कालच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री असे का वागत होते असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. निलंबीत केलेल्या सदस्यांना आजपर्यंत तरी कोणतेही आदेश आले नाही. आणि ते आदेश शासनाचे असावे लागतात त्याशिवाय त्या आदेशांना काही महत्व नाही. एकूणच पालकमंत्र्यांना आपले वागणं, बोलणं सुधारावं अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केले. दलित वस्ती योजनेतील आजही 4 कोटींचा निधी प्रलंबित आहे.

जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या कामामध्ये पालकमंत्री जाणुन बुजून त्रास देत आहेत आणि तो त्रास संपवण्यासाठी संघर्ष सुरूच आहे आणि तो संघर्ष पुढेही चालूच राहील असे डी.पी. सावंत म्हणाले. धर्माबाद येथे 12 कोटींचा निधी देण्याची घोषणा शासनाने जिल्हा नियोजन मंडळातील रक्कम द्यावी असे सांगितले. पण तो निधी मार्च 2019 पर्यंत आला नाही तर काय करणार, आपल्या जिल्ह्याचा पैसा एका तालुक्यावर खर्च होईल आणि तो परत आला नाही तर काय ? असा प्रश्न  सावंत यांनी उपस्थित केला.

या प्रसंगी मात्र पालकमंत्री रामदास कदम यांनी 5 वेळेस विचारलेल्या या प्रश्नांना उत्तर देताना प्रत्येक वेळेस या प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे असे सांगितले होते, त्याला बगल दिली. आमदार अमर राजूरकर यांनी पुन्हा सहाव्यांदा हाच प्रश्न उपस्थित केल्यानंतर रामदास कदम यांनी बैठक समाप्त झाल्याची घोषणा केली आणि त्यानंतर गोंधळ झाला होता. पालकमंत्री रामदास कदम यांनी काल दि. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना तेथील न घडलेल्या गोष्टी सांगितल्या याबद्दल आमदार डी.पी. सावंत यांनी खेद व्यक्त केला. रामदास कदम आता काय बोलतील ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.